Ajit Pawar's Rebellion Affect Maharashtra Politics: अजित पवारांच्या बंडखोरीमुळे काय परिणाम होणार? शरद पवार पुढे काय करणार? वाचा सविस्तर

आता राज्यातील जनतेला महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होणार? पक्ष वाचवण्यासाठी शरद पवारांकडे कोणता पर्याय आहे? राष्ट्रवादी आता पूर्णपणे अजित पवारांची राहणार का? असे अनेक प्रश्न पडले आहेत. या प्रश्नांची उत्तर जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात...

Sharad Pawar, Ajit Pawar, Supriya Sule (PC - Facebook)

Ajit Pawar's Rebellion Affect Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपप्रणीत आघाडी अर्थात एनडीएमध्ये (NDA) प्रवेश केला आहे. अजित आठ आमदारांसह राजभवनात पोहोचले आणि येथे त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. आपल्याला राष्ट्रवादीच्या 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. राष्ट्रवादीतील फुटीमुळे राज्यात राजकीय उलथापालथ झाली आहे. विशेषत: राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटात यामुळे अस्वस्थता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख म्हणजे शरद पवार यांचा आता दुसरा गट पडला आहे. आता राज्यातील जनतेला महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होणार? पक्ष वाचवण्यासाठी शरद पवारांकडे कोणता पर्याय आहे? राष्ट्रवादी आता पूर्णपणे अजित पवारांची राहणार का? असे अनेक प्रश्न पडले आहेत. या प्रश्नांची उत्तर जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात...

दरम्यान, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचे 56 आणि राष्ट्रवादीचे 54 उमेदवार विजयी झाले. काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. भाजपसोबत निवडणूक लढलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून युती तोडली. भाजप सर्वात मोठा पक्ष असतानाही बहुमताच्या आकड्यापासून दूर होता. बहुमतासाठी पक्षाला 145 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. घाईघाईत अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. (हेही वाचा - Sharad Pawar On Reliable Face of The Party: पक्षाचा विश्वासार्ह चेहरा कोण असेल? शरद पवारांनी हात वर करत दिलं 'हे' उत्तर)

अजित पवारांनी हे सर्व स्वबळावर केले. यासाठी त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची मान्यता घेतली नाही. एकंदरीत हे एक प्रकारचे बंड होते. त्यामुळे राष्ट्रवादीने पाच दिवसांतच पाठिंबा काढून घेतला. अजित यांना इच्छा असूनही भाजपसोबत जाता आले नाही आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पडले. दुसरीकडे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने मिळून सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. शिवसेनेत फूट पडून भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर अजित गटातील हालचाली तीव्र झाल्या. अजित गटाला महाराष्ट्रात भाजपशी युती करून राजकारण करायचे आहे, तर पवारांना ते नको आहे, असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. 2 मे रोजी शरद पवार यांनी अचानकपणे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नंतर नेत्यांच्या सांगण्यावरून पवारांनी राजीनामा मागे घेतला. मात्र, त्यानंतरच शरद पवार पक्षात काहीतरी मोठे करणार आहेत, हे निश्चित झाले.

त्यानंतर, पक्षाच्या 25 व्या स्थापना दिनाच्या समारंभात शरद पवार यांनी दोन कार्याध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये मुलगी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल याच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली. सुप्रिया यांना केंद्रीय निवडणूक समितीचे प्रमुख करण्यात आले. यादरम्यान अजित पवारांवर कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होणार?

एका हिंदी वृत्तसंस्थेशी बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे वकील चंद्र प्रकाश पांडे यांनी सांगितलं की, शिवसेनेबाबत गेल्या वर्षीही अशीच परिस्थिती होती. त्यानंतरही शिवसेनेचे बहुतांश आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले आणि काही वेळातच महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले. आता शिवसेना एकनाथ शिंदे यांनी पूर्णपणे काबीज केली आहे. मात्र, हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 54 जागा जिंकल्या होत्या. एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार यांनी आपल्याला 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. हे खरे असेल, तर एक प्रकारे अजित पवारांची बाजू भक्कम होते. कारण सध्या अजित विधानसभेतील विरोधी पक्षनेतेही आहेत. होय, केवळ आमदारांच्या पाठिंब्याने पक्षाचे अधिकार ठरवता येत नाहीत. त्यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्याचीही अजित पवारांना गरज आहे. अशा स्थितीत 40 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा करत अजित पवार यांनी आता एनडीएला हाताशी धरले असले तरी त्यांना नंतर सिद्ध करून पक्षावर पूर्ण पकड ठेवण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा विश्वास जिंकावा लागणार आहे.

तथापी, चंद्र प्रकाश पांडे यांनी पुढे बोलताना सांगितलं की, शरद पवार यांच्याकडे आता तीन मार्ग आहेत आणि ते तिन्ही मार्गांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. शरद पवार आधी विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याचे नाव बदलून बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी करू शकतात. त्यासाठी ते पक्षाच्या वतीने ते सभापती आणि राज्यपालांना पत्र लिहू शकतात. दुसरा मार्ग न्यायालयाच्या माध्यमातून असेल. शिवसेनेप्रमाणेच तेही या प्रकरणी आधी उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. तिसरे म्हणजे अजित पवार यांच्या दाव्याविरोधात ते निवडणूक आयोगाकडेही जाऊ शकतात. अशा स्थितीत निवडणूक आयोग आधी राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह जप्त करेल आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य तो निर्णय देईल.

लोकसभा निवडणूकीसाठी भाजपचा डाव -

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने हा मोठा डाव खेळल्याचे महाराष्ट्राचे राजकारण समजणाऱ्या जाणकारांचे म्हणणे आहे. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पडल्याने भाजपला फायदा होऊ शकतो. अजित पवार यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर चांगली पकड आहे. स्थानिक पातळीवरही त्यांना मोठी मागणी आहे. अशा स्थितीत आगामी काळात ते भाजप आणि शिवसेनेच्या मदतीने विरोधकांसाठी अडचणी निर्माण करू शकतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now