Locust Attack: टोळधाड म्हणजे काय? शेती आणि शेतकऱ्याला किती नुकसानकारक?

टोळांचे हे थवेच्या थवे जगभरातील विविध प्रदेशात पसरतात. ते ज्या प्रदेशात जातात तिथल्या पिकांचे, वनस्पतींचे नुकसान करतात. या नुकसानिलाच टोळधाड म्हणून ओळखले जाते.

Locust Attack | (Photo Credits: Pixabay | Archived, edited, symbolic images)

What is a Locust Attack: टोळधाड म्हणजे नेमके काय? हा प्रश्न कदाचित अनेकांना पडला असेल. पण टोळधाड हा काही नवा शब्द नाही. मराठी भाषा आणि माणसाला तो पूर्वीपासूनच प्रचलित आहे. शहरातच जन्मलेल्या, वाढलेल्या आणि आपलं गावपण सुटलेल्या अनेकांसाठी हा शब्द नवा असू शकतो. खरे तर टोळधाड (Locust Attack) हा मराठीतील एक वाक्यप्रचार आहे. कदाचित हा शब्द वाक्प्रचार (Phrases) म्हणून बऱ्याच काळाने प्रचलित झाला असवा. आगोदर ती एक घटना असावी. काही का असेना पण सध्या टोळधाड महाराष्ट्रातील शेतकरी, प्रशासन यांच्यासमोर आव्हान बणून उभी राहिली आहे. म्हणूनच अनेकांसाठी टोळधाडीचा घेतलेला एक धांडोळा.

भारतात 10 टोळधाडींची नोंद

भारतात यापूर्वीही अनेक टोळधाडी आल्या आहेत. त्यातील माघील शंभर वर्षांतील साधारण 10 टोळधाडीची नोंद आढळते. त्यातील सर्वात अलिकडची टोळधाड 1959 ते 1962 या काळात नोंदली गेली आहे. ज्यात पिकं आणि वनस्पती यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले नमूद करण्यात आले आहे. इतक्या वर्षानंतर मे 2020 मध्ये टोळधाड महाराष्ट्रात आली आहे. प्रामुख्याने या डोळधाडीचा प्रादुर्भाव विदर्भात दिसतो.

Locust Attack (Photo Credits: ANI)

टोळ आणि टोळधाडीची उत्पत्ती

मूळात टोळधाड समजून घेण्यासाठी टोळ म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. टोळ हा एक आंतरराष्ट्रीय पातळीवर उपद्रवी ठरलेला कीटक आहे. टोळ हा ऑर्‌थॉप्टेरा गणातील लोकस्टिडी (ॲक्रिडिडी) कुळातील कीटक आहे. जो वनस्पती आणि पिकांचे मोठे नुकसान करतो. टोळाला नाकतोडा असेही म्हटले जाते. हा टोळ जेव्हा समूहाने (मधमाशांप्रमाणे) प्रवास करतात आणि वनस्पती, पिकांवर हल्ला करतात तेव्हा त्याला टोळधाड म्हटले जाते. टोळधाडीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली जाते. ईजिप्शियन, हिब्रू भाषिक व ग्रीक लोकांनी टोळधाड आणि तिच्यापासून होणाऱ्या नुकसानीचे वर्णन प्राचीन काळी नमूद करुन ठेवले आहे. (हेही वाचा, Locust Attack: टोळधाड परतवून लावण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ढोल-ताशे वाजवले; प्रशासनाने जंतुनाशक फवारले (Video))

Locust Attack | (Photo Credits: Pixabay | Archived, edited, symbolic images)

लोकस्ट (टोळ)

टोळाला इंग्रजी भाषेत लोकस्ट असे नाव आहे. हे नाव लॅटिन भाषेतून आल्याचा दाखला मिळतो. लॅटिन भाषेत लोकस्ट याचा अर्थ 'जळालेली जमीन' असा आहे. टोळधाड ज्या परिसरात येऊन जाते तेथील पिकांची अवस्था जळालेल्या जमीनीसारखीच होते. टोळ हे वनस्पती, पीक यांची केवळ पाणे खातात. पाने घाऊन झाल्यामुळे वनस्पती, पीकांचे केवळ खोड, फांद्या आणि देठच जागेवर राहतात. त्यामुळे ते झाड, जळाल्यासारखे दिसते. उत्तर आफ्रिका, अरबस्तान, इराण, अफगाणिस्तान, उत्तर भारत आणि भूमध्य समुद्रातील बेटे आदी ठिकाणी टोळधाडीमुळे झालेल्या नुकसानीचे वर्णन प्राचिन वाङ्मयात आढळतो. (हेही वाचा, Locust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश - कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती)

Locust Attack | (Photo Credits: Pixabay | Archived, edited, symbolic images)

टोळाच्या जाती किंवा प्रकार

जगभरातील अनेक ठिकाणी टोळ आढळतात. प्रदेशानुसार त्याच्या प्रजाती वेगवेगळ्या असतात. परंतू, जगातील कोणताच भूप्रदेश असा नाही की, जिथे टोळ पाहायला मिळत नाहीत. टोळाचे प्रकार खालील प्रमाणे.

1) वाळवंटी टोळ (शिश्टोसर्का ग्रिगेरिया)

2) प्रवासी टोळ (लोकस्टा मायग्रेटोरिया)

3) मुंबई टोळ (पॅटंगा सक्सिक्टा).

प्राचिन काळापासून मनूष्य प्राणी टोळ आणि टोळधाडीचा विरोध करत आला आहे. आजवर त्याला ते शक्य झाले नाही. अर्थात नाही म्हणायला त्याला काही प्रमाणात नियंत्रण नक्कीच मिळवता आले आहे. मात्र, टोळांची वाढ हळूहळू होते. ती काही वर्षे सुरु असते. काही वर्षांत मात्र टोळांची वाढ मोठ्या प्रमाणावर होते आणि ती स्थिती साधारण 5 ते 10 वर्षे टीकते असे अभ्यासक सांगतात. पुढे त्यांची संख्या पुन्हा कमी कमी होत जाते. जी पुन्हा तितकीच वाढण्यास 1 ते 8 वर्षांचा काळ लागतो. दरम्यानच्या काळात टोळ हे समूहाने न राहता एकेकटे राहतात. त्याचा फारसा उपद्रव होत नाही. (हेही वाचा, Locust Attack In Maharashtra: भंडारा पाठोपाठ टोळधाडीचा गोंदिया मध्ये शिरकाव; प्रशासनाने सतर्क राहण्याचा दिला इशारा.)

Locust Attack | (Photo Credits: Pixabay | Archived, edited, symbolic images)

Locust Attack: महाराष्ट्रात टोळधाडचे थैमान; टोळधाडीला पळवण्यासाठी जंतुनाशक फवारणी, ढोल-ताशाचा वापर - Watch Video 

नैसर्गिक, मानवनिर्मीत अपत्ती अथवा इतर कारणांमुळे टोळांचे अन्न कमी होत जाते. ज्यामुळे अन्नाच्या शोधात हे टोळ एका छोट्याश्या प्रदेशात एकत्र येतात. हे एकत्र येणेच टोळांच्या मोठ्या वाढीस (प्रजनन) आणि टोळधाडीत रुपांतर होण्यास कारणीभूत ठरते. या टोळांचे रुपांतर मोठ्या समूहात झाल्यावर ते त्या छोट्याशा प्रदेशातून बाहेरपडतात. टोळांचे हे थवेच्या थवे जगभरातील विविध प्रदेशात पसरतात. ते ज्या प्रदेशात जातात तिथल्या पिकांचे, वनस्पतींचे नुकसान करतात. या नुकसानिलाच टोळधाड म्हणून ओळखले जाते.