शिवसेना पक्षाने सामनाच्या अग्रलेखातून शरद पवार यांना लगावला टोला; म्हणाले, वळणाचे पाणी वळणावरच जाते
या संदर्भात शिवसेना पक्षाने सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) शरद पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (National Congress Party) मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादी पक्षातून अनेक नेते भाजप किंवा शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश करत आहेत. साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच राष्ट्रवादीच्या पक्षाला रामराम ठोकला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर वारंवार टीका केली जात आहे. पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, असे शरद पवार यांनी वक्तव्य केले होते. या संदर्भात शिवसेना पक्षाने सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) शरद पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचा पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्याचप्रमाणे आज राष्ट्रवादी पक्षातील नेते इतर पक्षात जात आहेत. तसेच स्वाभिमान म्हणजे काय असतो? असा प्रश्नही सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष मेळाव्या दरम्यान पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर निशाना साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे. या वक्तव्यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टिका केली आहे. हा स्वाभिमान म्हणजे नेमका काय असतो पवारसाहेब? स्वत: पवार साहेबांनी स्वाभिमानाच्या मुद्यावर सोनिया गांधी यांच्याबरोबर मोठा राजकीय वाद केला होता. पवार साहेब, ज्यांना तुम्ही आज पळकुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून राष्ट्रवादीत आले होते. आज राष्ट्रवादीचीही तीच परिस्थिती झाली आहे. वळणाचे पाणी वळणावरच जाते, अशा शब्दात शिवसेनेने शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. हे देखील वाचा-देशावर कोणतेही आर्थिक संकट नाही, प्रत्येक क्षेत्रात वेगाने विकास होत आहे- रविशंकर प्रसाद.
सामना अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे
- आता इतिहास बदलणारे वारे वाहत आहेत.
-महाराष्ट्रातील मेगा गळतीचा फटका पवारांच्या राष्ट्रवादीला बसला आहे.
-शिवसेना सोडताना त्यांना काही स्वाभिमानाचे उजीर्ण झाले नव्हते व आजही पक्षांतर करताना स्वाभिमान वगैरेची ढेकर कुणी देत नाहीत.
-खरे तर स्वाभिमान हा शब्द सध्या कोणत्याही राजकारण्याने वापरु नये.
-पवारसाहेबांचे असे सांगणे आहे की, मी माझ्या राजकीय कारकीर्दीच्या ५२ वर्षांत २७ वर्षे सत्तेबाहेर होतो. सत्तेबाहेर राहून अधिक जोमाने काम केले आहे. आता पक्षांतर करणारे विकासासाठी जात आहेत, असे सांगतात तेव्हा गंमत वाटते!
सामनाचा अग्रलेख हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. सामना शिवसेना पक्षाचे वृत्त पेपर आहे. याआधीही शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून अनेकांवर टीका केली आहे. तसेच अनेकदा रायकीय मुद्दे मांडून सर्वाचे लक्ष आकर्षित केले आहे.