IPL 2019: वानखेडे स्टेडियम वर IPL सामने पाहण्यासाठी येणार्यांना 'पश्चिम रेल्वे'ची खास भेट; रात्री उशिरा धावणार चर्चगेट-विरार दरम्यान विशेष धीमी लोकल
आयपीएलच्या काळात चर्चगेट ते विरार दरम्यान पश्चिम रेल्वेवर धावणारी विशेष ट्रेन चर्चगेटवरून रात्री 1.15 वाजता सुटेल तर विरारला ही ट्रेन 2.50 मिनिटांनी पोहचणार आहे.
सध्या देशात लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Elections) धामधूमीसोबत आयपीएलचा (IPL 2019) फीव्हर रंगायला सुरूवात झाली आहे. 23 मार्च पासून सुरू झालेल्या आयपीएलच्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) काही महत्त्वाचे सामने रंगणार आहेत. दरम्यान रात्री उशिरा संपणार्या सामन्यानंतर लोकांना मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करता यावा यासाठी आयपीएलच्या काळात चर्चगेट ते विरार (Churchgate- Virar) दरम्यान पश्चिम रेल्वेवर (Western Railway) एक विशेष ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन चर्चगेटवरून रात्री 1.15 वाजता सुटेल तर विरारला ही ट्रेन 2.50 मिनिटांनी पोहचणार आहे.
कोणत्या दिवशी धावेल ही ट्रेन?
3rd/4th एप्रिल, 10th/11th एप्रिल, 15th/16th एप्रिल, 2nd/3rd मे आणि 5th/6th मे 2019 दिवशी ही विशेष ट्रेन रात्री धावणार आहे. IPL 2019 Full Schedule: 23 मार्च ते 5 मे दरम्यान रंगणार्या VIVO IPL 12 चे वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा; जाणून घ्या कधी, कुठे रंगणार आयपीएलचे सामने
चर्चगेट -विरार विशेष ट्रेनचं वेळापत्रक
आयपीएलचे सामने रात्री आठ वाजल्यापासून सुरू होतात. रात्री हा सामना संपण्यासाठी 12 वाजतात. अशावेळेस वानखेडे स्टेडियमवरून रसिकांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहचता यावं याकरिता पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरार दरम्यान सार्या स्थानकांवर थांबणारी एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.