Western Railway News: अज्ञाताच्या दडफेकीत मालगाडीचा सहाय्यक लोकोपायलट जखमी, Vaitarna Railway Station दरम्यानची घटना Assistant
मुंबई पश्चिम रेल्वेमार्गावरुन (Western Railway) धावणाऱ्या मालगाडीवर अज्ञाताने केलेल्या दगडफेकीत सरहाय्यक लोकोपायलट जखमी झाला आहे. ही घटना वैतरणा रेल्वे स्टेशनच्या पुढे काही अंतरावर घडली. लोकोपायलटला वसई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई पश्चिम रेल्वेमार्गावरुन (Western Railway) धावणाऱ्या मालगाडीवर अज्ञाताने केलेल्या दगडफेकीत सरहाय्यक लोकोपायलट जखमी झाला आहे. ही घटना वैतरणा रेल्वे स्टेशनच्या पुढे काही अंतरावर घडली. लोकोपायलटला वसई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिंभू दयाल मिना असे लोकोपायलटचे नाव आहे. तो घटना घलेल्या दिवशी म्हणजेच 15 ऑक्टोंबर रोजी गुजरातच्या बलसाड रेल्वे स्थानकापासून ते वसई रेल्वे स्टेशनपर्यंत यूएनजीयू-केटीआयजी या ट्रेनमध्ये मुख्य लोकोपायलट सुप्रिया अरविंद परोहा यांच्या यांच्यासह कर्तव्यावर होता. ही गाडी वैतरणा रेस्वेस्थानकावर दाखल झाल्यावर 7.55 वाजता सुटली. दरम्यान, स्टेशनपासून काहीच अंतरावर ट्रेन पोहोचली असता एक अज्ञात इसम पठरीजवळ असल्याचे पाहायला मिळाला. त्याने मालगाडीवर अचानक दगडफेक केली आणि पळून गेला. यात शिंभू दयाल मिना जखमी झाली.
ट्रॅकवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने गाडीच्या इंजिनवर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर गाडी जवळ येताच तो वेगाने पठरी पार करुन निघून गेला. मात्र, त्याने भिरकावलेला दगड इंजिनच्या लूकआऊट काचेला लागून उडाला आणि सहाय्यक पायलट शिंभू मिना यांच्या गळ्याला लागला. शिवाय दगड मोठा असल्याने काचेलाही तडे गेले. त्यातील काचेचे काही तुकडे उडाले आणि त्याच्या चेहरा ओठालाही लागले. ज्यामुळे ते जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने वसई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, लोकोपायलट सुप्रिया पहोरा यांनी वसई रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरुन रेल्वे पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भारतीय रेल्वे ॲक्ट् 1989 कलम 152 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपासास सुरुवात केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
रेल्वे गाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटना भारतासाठी नव्या नाहीत. पाठिमागील अनेक वर्षांमध्ये कैकवेळी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यातील काही समाजकंटकांना पकडून पोलिसांनी कायदेशीर कारवाईसुद्धा केली आहे. मधल्या काळात हे दगडफेकीचे प्रकरण कमी झाले होते. मात्र, अलिकडे पुन्हा एकदा अशा प्रकारच्या घटना वाढू लागल्या आहेत. खास करुन बिहार, पश्चिम बंगाल आणि देशातील इतरही अनेक विविध राज्यांमध्ये दगडफेकीच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. रेल्वेने दिलेल्या आकडेवारीवरुन सन 2019 पासून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवरही मोठ्या प्रमाणावर दगफेकीच्या घटना घडल्या आहेत. ज्यामुळे आतापर्यंत 55 लाख रुपयांच्या आसपास नुकसान झाल्याचे पुढे आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)