Weekend Lockdown in Maharashtra: राज्यातील निर्बंधांदरम्यान नक्की काय सुरु व काय बंद याबाबत शासनाने जारी केले FAQs; जाणून घ्या कोणती दुकाने उघडी असतील

अशावेळी आता राज्य सरकारने, काय सुरु असेल व काय बंद असेल याबाबत सातत्याने विचारले जाणारे प्रश्न व त्याबाबतची उत्तरे जारी केली आहेत

Curfew | Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाचा सामना करण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये कडक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत निर्बंध, रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी व विकेंड लॉकडाऊनचा समावेश आहे. या काळत काय सुरु असेल व काय बंद असेल याबाबत शासनाने नियमावली जाहीर केली आहे, मात्र तरी अनेक लोक याबाबत अजूनही गोंधळलेले असल्याचे दिसत आहे. अशावेळी आता राज्य सरकारने, काय सुरु असेल व काय बंद असेल याबाबत सातत्याने विचारले जाणारे प्रश्न व त्याबाबतची उत्तरे जारी केली आहेत. या प्रश्न-उत्तरांमधून जनतेला योग्य ती माहिती मिळेल अशी आशा आहे.

प्रश्न- सुपरमार्केट किंवा मॉल, जसे की डी-मार्ट, बिगबाजार, रिलायन्स सुरु राहतील?

उत्तर- शासन आदेश दिनांक 4 व 5 एप्रिलप्रमाणे अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी 7 ते 8 दरम्यान खुले राहू शकतात. जिथे एक किंवा जास्त वस्तू विकल्या जात आहेत, तिथे फक्त अत्यावश्यक सेवांचा विभाग सुरु असेल.

प्रश्न- विकेंड लॉकडाऊन दरम्यान काय सुरु असेल व काय बंद असेल?

उत्तर- अत्यावश्यक सेवांमध्ये वर्गीकृत केल्या जाणाऱ्या सर्व सेवा यावेळी सुरु राहतील. कोणत्याही व्यक्तीला वैध कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.

प्रश्न- एपीएमसी मार्केट विकेंड लॉकडाऊनवेळी खुले ठेवले जाऊ शकते?

उत्तर-  होय, नियमांचे पालन करून हे मार्केट खुले राहू शकते.

प्रश्न- बांधकाम साहित्य विकणारी दुकाने सुरु राहू शकतील?

उत्तर- नाही

प्रश्न- वाहतूक व्यवस्थेला मदत करण्यासाठी गॅरेजेस सुरु राहू शकतील?

उत्तर- हो, नियमांचे पालन करून गॅरेजेस सुरु राहतील.

प्रश्न- ऑटोमोटिव्ह स्पेअर पार्ट्सची दुकाने सुरु राहतील?

उत्तर- नाही

प्रश्न- केंद्र सरकारचे कर्मचारी, पीएसयू यांची अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांमध्ये गणती होईल का?

उत्तर- नाही, सर्व केंद्र सरकार/पीएसयू कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवा प्रदाता म्हणून गणले जाणार नाही. (हेही वाचा: महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार! मागील 24 तासांत आढळले 58,993 नवे कोरोनाचे रुग्ण)

प्रश्न- नागरिक दारू खरेदी करू शकतात?

उत्तर- होय, शासनाच्या 4 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशानुसार नागरिक बारमधून (टेक अवे) दारू खरेदी करु शकतात किंवा बारमधून घरी डिलिव्हरी घेऊ शकतात.

प्रश्न- दारूची दुकाने खुली राहू शकतात? किंवा होम डिलिव्हरी देऊ शकतात?

उत्तर- नाही

प्रश्न- रस्त्याच्या कडेचे ढाबे सुरु राहू शकतील?

उत्तर- होय, मात्र फक्त टेक अवे / डिलिव्हरीसाठी परवानगी असेल.

प्रश्न- विद्युत उपकरणांची दुकाने सुरु राहतील?

उत्तर- नाही

प्रश्न- दूरसंचार उपकरणांची (फोन, लॅपटॉप इ.) दुकाने सुरु राहतील

उत्तर- नाही

प्रश्न- आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सीएससी केंद्र, सेतू केंद्र, पासपोर्ट सेवा केंद्र अशी विविध सरकारची व्यवस्थांसाठी मदत पुरवणारी केंद्रे सुरु राहतील?

उत्तर- हो, सोम-शुक सकाळी 7 ते 8 या वेळेत.

प्रश्न- रेस्टॉरंट्स आणि बार विकेंडला रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत पार्सल पुरुवू शकतात?

उत्तर- स्थानिक प्राधिकरणाने दिलेल्या वेळेनुसार रेस्टॉरंट्स आणि बार कार्यरत राहतील. मात्र ग्राहक तिथे बसू शकत नाहीत. सोम-शुक सकाळी 7 ते 8 या वेळेत ग्राहकांना स्वतः रेस्टॉरंटमधून पार्सल घेण्याची परवानगी आहे. ई-कॉमर्सद्वारे होम डिलिव्हरी चालू आहे. विकेंडबाबत स्थानिक अधिकारी निर्णय घेतील.