प्रेमप्रकरणामुळे लग्नाच्या दिवशी भावाचा जीव धोक्यात, आरोपीकडून हत्याराने हल्ला
ठाण्यामध्ये एका तरुण मुलीच्या भावाचा पाठलाग करुन बहिणाच्या लग्नावेळी त्याच्यावर आणि काकीवर हत्याराने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.
ठाण्यामध्ये एका तरुण मुलीच्या भावाचा पाठलाग करुन बहिणाच्या लग्नावेळी त्याच्यावर आणि काकीवर हत्याराने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. तर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
एकतर्फी प्रेमातून चेतन लाड नावाच्या मुलाने प्रेयसीच्या भावावर हल्ला केला. कारण प्रेयसीच्या घरातील मंडळींनी तिचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरविले होते. तसेच लग्नाच्या वेळी या प्रियकराने प्रेयसीच्या भावाला आणि काकीला रस्त्यामध्ये गाठून हत्याराने हल्ला केला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळाच्या येथून पळ काढला.
या प्रकरणी हल्ला झालेल्या तरुणाने पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध काढून त्याला अटक केली आहे. तसेच चेतन लाड हा लग्न ठरलेल्या मुलीच्या पूर्वीच्या इमारतीत राहत होता.
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2018 04:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

