Weather Update: राज्यातील 'या' ठिकाणी यलो अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
आज राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस असेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे.
Weather Update: कालपासून राज्यभरात पावसाने हैरान केलं आहे.राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे रौद्र रुप पाहायला मिळत आहे. तर आज देखील राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस असेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे. हवामान खात्याने आज ठाणे, रायगड, रत्नागिरि या ठिकाणी येलो अलर्च जारी करण्यात आला आहे. विसर्जनाच्या वेळी पावसाने ठिकठिकाणी धुमाकुळ घातला होता. राज्यात काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात काही ठिकाणी परतीचा पाऊस पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाने जारी केल्यानुसार आज ठाणे, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी यलो अलर्ट आहे. विजांच्या कडकडाती सह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काल या ठिकाणी मुसळधार पाऊस होता. मुंबईत आज हलका पाऊस असणार आहे. मुंबई उपनगरासह काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील. रत्नागिरीत देखील आज यलो अलर्ट जारी केला आहे.
मान्सून पश्चिमेकडे सरकत असल्याने राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. तर काही ठिकाणी परतीचा पाऊस पाहायला मिळला आहे. पुणे आणि आसपासच्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.