Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

Weather Update:  देशात काही ठिकाणी थंडीची चाहूल वाढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातसह देशातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज देशभरात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून तर काही भागात हवामान कोरडं राहणार आहे.  महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही. तामिळनाडू, केरळ, कर्नाटकसह लक्षद्वीप बेटावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या राज्यात कोरडं वातावरण आहे. राज्यात २३ नोव्हेंबर पर्यंत बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असल्याने हवामानात बदल दिसत आहे. बऱ्याचं ठिकाणी वातावरण अनुकुल राहील, तर काही ठिकाणी थंडीचा वातावारणात वाढ होईल. अंदमान आणि निकोबार बेटावर देखील अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. चक्रीवादळामुळे  वातावरणात बदल झाला असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता नाही. पण पुढील काही दिवसांपर्यंत चक्रीवादळामुळे थंडीच्या वातावरणात वाढ होईल. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात आज कोरडं वातावरण राहील. 24 नोव्हेंबरला दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे.