IPL Auction 2025 Live

Weather Update: ठाण्यात रेड अलर्ट, 28 सप्टेंबरला मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर-IMD

त्यानुसार अतिमुसळधार पावसाची शक्यता 28 सप्टेंबरला व्यक्त करण्यात आली आहे.

Photo Credit: File Image

Weather Update: आयमडी (IMD) कडून पालघर, रायगड आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार अतिमुसळधार पावसाची शक्यता 28 सप्टेंबरला व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मुंबईसाठी उद्या ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.(मुंबईत 800 हून अधिक अधिकृत खड्डे असल्याची माहिती पण नागरिकांनी व्यक्त केला संताप)

ठाणे, पालघर आणि मुंबईसाठी यल्लो अलर्ट जारी केला असून अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, गुलाब चक्रीवादळ हे नॉर्थ वेस्ट आणि बंगालच्या किनारपट्टीलगतच्या येथून 18kmph च्या वेगाने पश्चिमेच्या दिशेला सरकत आहे. गुलाब चक्रीवादळाचे डॉप्लर वेदर रडारद्वारे निरीक्षण केले जात आहे.(Cyclone Gulab: गुलाब चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात; राज्याला 3-4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा)

Tweet:

आयएमडीच्या वैज्ञानिक शुभांगी भुटे यांनी असे म्हटले की, गुलाब चक्रीवादळ हे शनिवारी संध्याकाळी तयार झाले असून ते पश्चिम आणि पूर्व आंध्र प्रदेश, साउथ ओडिसा दरम्यान रविवारी संध्याकाळी कलिंगापट्टम आणि गोपालपूर येथे धडकले. महाराष्ट्रात अतिमुळधार पाऊस आणि काळे ढग पहायला मिळाले. तर 27 सप्टेंबरला विदर्भ- मराठवाड्यात याचा परिणाम दिसून येणार आहे. तर 28 सप्टेंबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तर मच्छिमारांनी सुद्धा समुद्रात जाणे टाळावे.