Weather Forecast: कसा असेल आजचा पाऊस? काय म्हणतो हवामानाचा अंदाज? घ्या जाणून
आयएमडीकडून वर्तवला जाणारा हवामानाचा अंदाज (IMD Weather Forecast) बळीराजाला काहीसा दिलासा देणारा ठरतो आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजामध्ये पुढचे तीन दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण मात्र तापलेलाच राहणार आहे.
Maharashtra Rain Update: उन्हाच्या झळांनी अवघा महाराष्ट्र व्यापला असला तरी, वाढत्या तापमानात बरसणारा अवकाळी पाऊस वातावरणात काहीसा गारवा निर्माण करतो आहे. त्यामुळे उकाड्याने कासावीस झालेल्या जीवांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला आयएमडीकडून वर्तवला जाणारा हवामानाचा अंदाज (IMD Weather Forecast) बळीराजाला काहीसा दिलासा देणारा ठरतो आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजामध्ये पुढचे तीन दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण मात्र तापलेलाच राहणार आहे. उलट कोकणामध्ये उष्णतेची लाट संभवते अशी शक्यता (Weather Forecast) भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
वादळी पाऊस
आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह प्रति तास 40-50 किमी वेगाने धावणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात गारपीट होण्याचाही संभव असल्याचे आयएमडी म्हणते. (हेही वाचा:IMD Weather Update: महाराष्ट्रात कुठे अवकाळी पाऊस, गारपीट, तर कुठे वादळी वारे, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज)
कोकण तापलेलेच
कोकण विभात तापमान चढेच राहणार असून काही ठिकाणी उष्णतेची लाट संभवते. त्यामुळे या भागात उकाडा आणि वातावरण दमट राहणार आहे, अशी माहिती आयएमडीने हवामान अंदाज वर्तवताना केलेल्या एक्स पोस्टमध्ये दिली आहे.
‘यलो अलर्ट’चा इशारा
राज्यामध्ये पाठीमागील सलग तीन दिवसांमध्ये कमाल तापमानात 4 ते 5 अंशांनी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय अनेक ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयएमडीने राज्यात सर्वत्र 'यलो अलर्ट' जारी केला आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: मतदारांनो काळजी घ्या, राज्यात तुफान पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट)
मान्सूनचे आगमन लवकर
यंदा मान्सूनचे आगमन काहीसे लवकर होणार असल्याचे भविष्य हवामान विभागाने आगोदरच वर्तवले आहे. दरम्यान, यंदाच्या वर्षी दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग तसेच निकोबार बेटांवर मान्सून 19 मेच्या दरम्यानच दाखल होण्याची चिन्हे आहेत.
एक्स पोस्ट
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. दुपार / संध्याकाळ पर्यंत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७°C आणि २६°C च्या आसपास असेल. pic.twitter.com/cX2qkGka7f
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 14, 2024
राजधानीचे शहर असलेली मुबई पुढच्या 24 तासांमध्ये वादळी पाऊस अनुभवू शकते. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरांना पाऊस आणि सोबतच उष्णतेच्या लाटेचाही सामना करावा लागू शकतो. सकाळी कोरडे आणि निरभ्र असलेले वातावरण दुपार/सायंकाळपर्यंत पालटू शकते. ज्यामुळे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 37°C आणि 26°C च्या आसपास राहील, असेह हवामान विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात आणि राजधानी मुंबईमध्ये या आठवड्यात आलेल्या पावसाने काही ठिकाणी जोरदार तडाखा दिला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर काही ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या.
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2024 08:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

