Weather Alert : राज्यातील तापमान वाढण्याची शक्यता, उन्हाळ्याची चाहूल
तापमानाचा पारा वाढू लागल्यानेक उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. . परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात यंदा उन्हाच्या झळा अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्याची (Summer) चाहूल लागली असून पुढील दोन, तीन दिवसात राज्यातील तापमान अधिक वाढण्यची शक्यता आहे. राज्यातील विविध ठिकाणांसह मराठवाड्यात पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये किमान व कमाल तापमान (Maharashtra Temperature) 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढण्याची शक्यता हवामान केंद्राने ( Maharashtra Weather) वर्तवली आहे. पाठिमागच्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यातील तापमान 10 अंशांपेक्षा खाली घसरले होते. त्यामुळे थंडीचा कडाका वाढलेला जाणवत होता. दरम्यान, आता तापमानाचा पारा वाढू लागल्यानेक उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. . परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात यंदा उन्हाच्या झळा अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्राने माहिती देताना म्हटले की, मराठवाडा पुढचे दोन ते तीन दिवस वाढत्या तापमानाचा सामना करेल. हे तापमान हळूहळू वाढण्याची शक्यताआहे. सुरुवातीला यात 2 ते 3 अंश सेल्सियस इतके तापमान पाहायला मिळेल. त्यानंतर त्यात हळूहळू घटही जाणवू लागेल. सॅक, इस्रो आदी नामांकीत संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बाष्पोत्सर्जन मोठ्या प्रमाणावर वाढले असून, जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे. त्यामळे शेतीलाही अधिक पाण्याची गरज भासू शकते. (हेही वाचा, Heatwaves: भारताला उष्णतेचा तडाखा; पाठिमागील 50 वर्षात 17,000 नागरिकांचा मृत्यू)
पुढचे दोन-तीन दिवस थंडी कमी असली तरी 16 ते 22 फेब्रुवारी या काळात सरासरी तापमान मध्यम प्रमाणात तर सरासरी कमाल आणि किमान तापमानापेक्षा कमी राहिली. त्यामुळे मराठवाड्यातील वातावरण पुढचे काही काळ 'कभी नरम कभी गरम' असे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, वातावरणातील बदलांना सामोरे जाताना नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यायला हवी, या काळात सर्दी, थंडी, ताप, खोकला अशा नेहमीच्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.