CM Eknath Shinde On Mayor Selection: आम्ही जनतेच्या मागण्यांवर काम करतोय, आमचा अजेंडा राबवत नाही; नगराध्यक्ष, सरपंचांच्या निवडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला

महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेकडून सरपंचांची निवड ही थेट जनतेतून करावी, अशी मागणी करण्यात आली होती. ती मागणी आम्ही मान्य केली. आम्ही जनतेच्या मागण्यांवर काम करत आहोत. आम्ही आमचा अजेंडा राबवत नाही, असंही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde , Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

CM Eknath Shinde On Mayor Selection: नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड ही थेट जनतेतून करावी, अशी मागणी जनतेकडूनचं करण्यात आली होती. तो आमचा अजेंडा नाही. आम्ही आमचा अजेंडा राबवत नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिलं. महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत औद्योगिक नगरी पंचायत विधेयक 2022 संमत करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी आज विधिमंडळात केली. त्यानंतर हे विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलं.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून करता, मग मुख्यमंत्र्यांची निवडही जनतेतून करा, असा टोला एकनाथ शिंदे यांना लगावला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “थेट नगराध्यक्ष करावा असा निर्णय 2006 साली घेण्यात आला होता. हा निर्णय आम्ही बदलला असं नाही. नगरविकास मंत्र्याने निर्णय घेतला म्हणजे तो एका मंत्र्यांचा निर्णय नसतो. तो सर्व मंत्र्यांचा असतो. एखादा गुंड एखाद्या वॉर्डात पैशाच्या जीवावर निवडून येऊ शकतो. पण पूर्ण शहरात पैशाच्या जीवावर तो निवडून येऊ शकत नाही. मग यावर मुख्यमंत्री जनतेतून निवडा, अशी मागणी विरोधकांनी केली. मुख्यमंत्र्यांची जनतेतून निवड कशी करायची, मग घटनेत बदल करायचा का ? आमचं सरकार घटनेनुसारच काम करत आहे, असं मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. (हेही वाचा - Supreme Court On BMC Election Ward: BMC वॉर्ड पुनर्रचनेबाबत स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा उध्दव ठाकरेंना दिलासा)

महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेकडून सरपंचांची निवड ही थेट जनतेतून करावी, अशी मागणी करण्यात आली होती. ती मागणी आम्ही मान्य केली. आम्ही जनतेच्या मागण्यांवर काम करत आहोत. आम्ही आमचा अजेंडा राबवत नाही, असंही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, विरोधक म्हणतात की मी सक्षम नाही. मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? करेक्ट कार्यक्रम केला का नाही. जयंतराव मला भेटले आणि म्हणाले असं कसं झालं? दादा ते तुमचं ऐकत होते म्हणून ते आमचं ऐकत नव्हते, असं म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. ‘देवेंद्रजी और में हू साथ साथ, मेरा नाम है एकनाथ', असं म्हणताचं सभागृहात एकच हशा पिकला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now