सुपरफ्लॉप होण्याच्या भीतीने मोदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर: राज ठाकरे

त्यासाठी प्रयत्न करा असेही राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray | (Photo Credits: Youtube)

Raj Thackeray's speech in Satara: 'आगोदरच मोदी त्यात विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) कोण पाहायला जाईल हा चित्रपट?' अशी उपहासात्मक टीका करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'लोक चित्रपट पाहायला आले नाहीत आणि चित्रपट पडला तर काय करायचे? अशी भीती वाटल्यानेच मोदी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचा घणाघात भाजपवर केला आहे. पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारीत पीएम नरेंद्र मोदी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्याची प्रदर्शनाची तारिखही ठरली होती. मात्र, निवडणूक सुरुअसल्याने हा चित्रपट मतदारांवर प्रभाव टाकू शकतो. तसेच, आचारसंहितेचे उल्लंघनही होऊ शकते असा आरोप केल्यावर न्यायालयाने निवडणूक काळात या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.  राज ठाकरे सातारा (Satara) येथील जाहीर सभेत गुरुवारी (17 एप्रिल) रात्री बोलत होते. या सभेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

मोदी, शाह यांना देशाच्या राजकीय क्षितिजावरुन दूर करा

राज ठाकरे यांनी सातारा येथील जाहीर सभेतून पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. तसेच, मोदींच्या निवडणूक आणि एकूण प्रचारतंत्रावरही जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी हे प्रचारासाठी हीटलर याची पद्धत वापरत आहेत. अॅडॉल्फ हिटलर हा देखील त्या काळात रेडीओवरुन भाषणं करायचा. माहितीपट आणि चित्रपट काढून लोकांपर्यंत पोहोचायचा. सध्याही तेच सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही रेडिओवरुन भाषणं करतात. त्यातून मोठमोठी आश्वासनं देतात. ती प्रत्यक्षात मात्र उतरत नाहीत. त्यामुळे देशात हुकुमशाही आणू पाहणारी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह ही दोन माणसं देशाच्या राजकीय क्षितीजावरुन बाजूला गेली पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न करा असेही राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Lok Sabha Election 2019: मनसेच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा पाच वर्षात मारलेल्या थापा मोजा - राज ठाकरे यांचा भाजपाला टोला)

राज ठाकरे यांच्या सभांचा राज्यभर धडाका

राज ठाकरे यांनी मोदींच्या कारभारावर टीका करताना मोदींच्या भाषणाच्या ध्वनीचित्रफिती (व्हिडिओ) दाखवल्या. या ध्वनीचित्रफितींच्या माध्यमातून राज यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बदललेल्या भूमिकांचा पोलखोल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे कट्टर विरोधक आणि टीकाकार म्हणून पुढे आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी या निवडणुकीत एकही उमेदवार निवडणूक प्रक्रियेत उतरवला नाही. मात्र त्यांनी राज्यभर सभांचा धडाका लावला आहे. त्यांच्या भाषणांना जनमानसातही जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. (हेही वाचा, पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासणी करणारे IAS अधिकारी मोहम्मद मोहसिन निलंबित; निवडणूक आयोगाची करावाई)

राज ठाकरे सातार भाषण व्हिडिओ

शिवसेनेला नामोल्लेखाने मारले

महत्त्वाचे म्हणजे राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर घनाघाती हल्ला चढवत आहेत. मात्र, हे करत असताना ते चुकूनही युती किंवा भाजपच्या मित्रपक्षांवर बोलणे कटाक्षाने टाळत आहेत. त्यामुळे राज हे भाजपच्या मित्रपक्षांना प्रामुख्याने शिवसेनेला अनुल्लेखाने मारत असल्याची चर्चा रंगली आहे. असे असले तरी सातारा येथील सभेत राज यांनी अप्रत्यक्षपणे सूचक विधान केले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि शाह पर्यायाने भाजपला मदत करु नकाच. परंतू, मोदी, शाह यांना मदत ठरेल अशांनाही मदत करु नका, असेही राज ठाकरे म्हणले.