Locust Attack: टोळधाड परतवून लावण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ढोल-ताशे वाजवले; प्रशासनाने जंतुनाशक फवारले (Video)

कोणत्याही शेतात टोळधाडीने प्रवेश केला असता, ते एका रात्रीत सुमारे पाच ते सहा किलोमिटर परिसरातील पीक फस्त करु शकतात. हे टोळ झाड, वनस्पती अथवा पीकांची पाने खातात. त्यामुळे त्याचा धोका अधिक वाढतो.

Locust Attack | (PC - Twitter/ANI)

कोरना व्हायरस (Coronavirus) संकटासोबत महाराष्ट्रात आलेले टोळधाडीचे संकट आव्हान बनले आहे. आगोदरच कोरोना आणि लॉकडाऊन यांमुळे शेतातील पीक शेतातच आहे. ते नुकसान सहन करुन शेतकऱ्याने काही नवे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. अशात टोळधाड (Locust Attack) शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचली आहे. टोळधाडीमुळे होणारे शेतीचे नुकसान मोठ्या प्रामाणावर होत असल्यने शेतकरी विविध उपाययोजना करत आहे. शेतकऱ्यांसोबतच प्रशासकीय आणि कृषी विभागाचे अधिकारीही त्याला सहकार्य करत आहेत. भंडरा (Bhandara) जिल्ह्यातील येथील शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे प्रयत्न करत ढोल-ताशे वाजवले आणि टोळधाड परतवून लावण्याचा प्रयत्न केला. तर, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निर्जंतुकीकरण करुन टोळधाडीचा शेतावरील हल्ला परतवून लावण्यास शेतकऱ्यांना मदत केली.

टोळ हा एक आंतरराष्ट्रीय पातळीवर उपद्रवी समजला जाणारा कीटक आहे. हा किटक बहुसंख्येने प्रवास करत असतो. जसे मधमाशा एकत्र प्रवास करतात, जमून असतात त्याच प्रमाणे हे टोळ एकत्र समूह करुन असतात. अशा टोळांच्या मोठ्या समूहाने शेतात, अथवा कोणत्याही ठिकाणी प्रवेश, प्रवास करणे म्हणजे टोळधाड म्हणता येऊ शकते. हे कीटक शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात तेव्हा टोळधाड या शब्दाची व्याप्ती अधिक वाढते. मराठीमध्ये टोळधाड नावाचा एक वाक्य प्रचारही आहे. (हेही वाचा,Loctust Attack in Maharashtra: अमरावती जिल्ह्यात टोळधाड दाखल; फळभाज्या व पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान )

एएनआय ट्विट

दरम्यान, शेतकऱ्यांसाठी टोळधाड ही प्रचंड उपद्रवी आणि नुकसानकारक ठरते. कोणत्याही शेतात टोळधाडीने प्रवेश केला असता, ते एका रात्रीत सुमारे पाच ते सहा किलोमिटर परिसरातील पीक फस्त करु शकतात. हे टोळ झाड, वनस्पती अथवा पीकांची पाने खातात. त्यामुळे त्याचा धोका अधिक वाढतो. सध्या शेतकऱ्यांच्या शेतातली पीक बऱ्यापैकी काढली आहेत. त्यामुळे शेतात पिके नाहीत. मात्र, तरीही शेतातील झाडे, मागास पिके यांचे टोळधाडीमुळे नुकसान होत आहे. सध्या ही टोळधाड विदर्भात मोठ्या प्रमाणावर आहे.