Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटात 200 फूट खोल दरीत कोसळली कार; 3 ठार 3 गंभीर जखमी, माणगाव पुणे मार्गावरील घटना

तर तिघे जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर माणगाव येथील खासगी रुग्णालया उपचार सुरु आहेत. ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) कारला अपघात घडला.

Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

वाशिम (Washim) येथे माणगाव-पुणे महामार्गावर ताम्हिणी घाटात झालेल्या कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर माणगाव येथील खासगी रुग्णालया उपचार सुरु आहेत. ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) कारला अपघात घडला आणि ही कार तब्बल 200 फूट खोल दरीत कोसळली. ही घटना शनिवारी (20 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण वाशीम जिल्ह्यातील आहेत.

प्राप्त माहिती अशी की, अपघातात मृत्यू झालेले आणि जखमी असलेले सर्व युवक हे वाशीम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हे सर्वजण कोकण दर्शनासाठी गेले होते. कोकण पर्यटण करुन परतताना ताम्हिणी घाटात त्यांच्या कारला अपघात झाला. त्यांची कार दरीत कोसळली. या कारचा अक्षरश: चुराडा झाला. (हेही वाचा, Maharashtra: गोंदियामध्ये प्रवाशांनी भरलेली रेल्वे मालगाडीला धडकली, 50 हून अधिक जण जखमी)

ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर रोशन गाडे, प्रवीण सरकटे व रोशन चव्हाण अशी जखमींची नावे आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif