Wardha News: शालेय पोषण आहारातील धान्य चोरट्यांचा पदार्फाश,वर्धातील खळबळजनक घटना
शाळकरी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शालेय पोषण आहाराचे शोषण करणारा काळा बाजार वर्ध्यातून समोर येत आहे.
Wardha News: सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळावा यासाठी सरकारने अनेक उपाय योजना केल्या आहे. प्रत्येक मुलांच्या आरोग्यासाठी शाळेतून पोषण आहार मिळाव या संकल्पनेतून आहार दिला जातो दरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शालेय पोषण आहाराचे (School Nutrition Food) शोषण करणारा काळा बाजार वर्ध्यातून समोर येत आहे. पोषण आहारातीली धान्याची चोरी करणाऱ्या चोरट्यांनी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या घटनेची माहिती गावात पसरताच, मोठी खळबळ उडाली आहे. वर्ध्यातील सेवाग्राम पोलिसांनी या चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.
माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणात व्यापाऱ्यांसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वाहनांसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल देखील जप्त केला. किशोर नारायण तापडिया रा एसटी डेपोजवळ, रामनगर, विनोद बबन भांगे रा. बोरगांव (मेघे), शेख रहिम शेख करीम रा, स्वस्तिक नगर, सावंगी (मेघे), अंकीत सतिश अग्रवाल रा, मुर्तिजापूर, अकोला यांच्यासह इतरांवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या गुन्हेगारांकडून 8 लाख 69 हजार 810 रुपयांचा धान्यसाठा जप्त केला आहे. (हेही वाचा- वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे कापसाचे पीक सडले, बळीराजामध्ये पसरले चिंतेचे वातावरण
सेवाग्राम पोलिसांनी वाहनात २५ क्विंटल तांदुळ आढळून आले. त्याला पोलिसांनी आपला इंगा दाखवताच त्याने हा तांदूळ MIDC परिसरातील किशोर तापडीया यांच्या गोडाऊनमधून खरेदी केल्याचे सांगितले. तसेच सदर तांदूळ सांवगी(मेघे) येथील धान्य तस्कर शेख रहीम शेख करीम याला विकणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान धान्याचा काळाबाजार चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
राज्यातील शाळेय मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी राज्यशासरन प्रयत्नशील आहे.दरम्यान या घटनेनंतर शाळेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोषण आहाराचा काळाबाजार होत असल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले. पोलिस या आरोपींवर का कारवाई करते असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.