Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं; चौकशी सुरू

या दोघांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

Pooja Chavan (Photo Credit: Instagram)

Pooja Chavan Suicide Case: सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण (Pooja Chavan) च्या आत्महत्याप्रकरणी पुण्यातील वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) अखेर आज दोघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून या दोघांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांनी पूजाच्या आत्महत्येनंतर तब्बल 11 दिवसानंतर दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. मात्र, हे दोघे कथित व्हायरल क्लिपमधील विलास आणि अरुण राठोड तर नाही ना? हे सांगण्यास वानवडी पोलिसांनी नकार दिला आहे.

आज पूजाचा दशक्रिया विधी गंगाखेडमध्ये गोदावरी नदीकाठी पार पडला. पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात या दोघांची काय भूमिका आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. (वाचा - Abu Azami On Live in Relationship: काही महिला पुरुषासोबत वर्षभर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला - अबू आझमी)

मराठवाड्यात राहणारी पूजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. पूजा आपल्या भावासोबत हडपसर भागात राहात होती. मात्र, रविवारी मध्यरात्री दीड वाजता तिने सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. पूजाच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. ज्या ऐकल्यानंतर पूजाच्या आत्महत्या प्रकरणाचे गुढ आणखी वाढले आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव चर्चेत आहे. अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी केली आहे. अद्याप संजय राठोड यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.