Virar Shocker: दुकानात काम करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने हल्ला; विरारच्या घटनेमुळे परिसरात खळबळ

या घटनेमुळे विरार हादरले आहे. दुकानात काम करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे.

virar Attack (Photo credit Twitter)

Virar Shocker: विरारमध्ये (Virar)  एका दुकानात थरारक घटना घडली आहे अंगावर काटा हा क्षण सीसीटिव्ही कॅमेरात (CCTV Camera) कैद झालेला आहे. दुकानदात काम करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने  पाच ते सहा वेळा वार केल्याच्या घटनेमुळे विरारमध्ये खळबळ उडाली आहे. पाच ते सहा वेळा पाठीवर वार केल्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली आहे. विरारच्या संजीवनी हॉस्पिटल (Sanjivani Hospital)  मध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत. हल्लेखोर तरुणीने पिशवीतून कोयता आणला होता. काही क्षणातंच हल्लेखोर तरुणीने पीडीतेवर निर्दयी वार केला.

विरार पश्चिमेतील विराटनगर परिसरातील रेल्वे स्थानकाजवळील भास्कर कॉम्प्लेक्स मध्ये एका दुकानात ही घटना घडली आहे. सुनील गुप्ता मालकीचे असलेल्या  या दुकानात प्रचिती नावाची तरुणी काम करत होते. प्रचिती शनिवारी रात्री ८च्या सुमारास काम करताना एक अनोखळी मुलगी दुकानात वस्तू घेण्याच्या निमित्ताने आली.  काही क्षणातच तीनं पिशवीतला कोयता काढला अण् तिच्या वर हल्ला केला.

दुकानात इतर स्थानिकांच्या मदतीने वेळीच आरोपी तरुणीला पकडण्यात आले. पोलीसांना या घटनेची माहिती देताच घटनास्थळी आले. तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याचे चित्र कॅमेरात कैद झाला. गंभीर जखमेत असलेल्या पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्या तीच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या व्हिडिओ मुळे सर्वांचे झोप उडाली आहे. सोशल मीडियावर देखील हा व्हिडिओ काही युजर्सने पोस्ट केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement