Violence in Maharashtra: राज्यातील हिंसाचारासाठी आमदार Nitesh Rane यांनी Raza Academy ला जबाबदार धरले; केली बंदी घालण्याची मागणी
पोलिसांनी काही ठिकाणी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. कालच्या हिंसाचारात काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. जमावाने केलेल्या दगडफेकीत दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले
त्रिपुरा हिंसाचारानंतर (Tripura Violence) महाराष्ट्रातील नांदेड (Nanded) शहरात काल झालेल्या हिंसाचारासाठी महाराष्ट्राचे भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी रझा अकादमीला जबाबदार धरले आहे. रझा अकादमीला दहशतवादी संघटना बनवून हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील नांदेड शहरात काल झालेल्या हिंसाचारामागे रझा अकादमीचा हात असल्याचे नितेश राणे म्हणाले. त्यांनी रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारने रझा अकादमीवर कारवाई केली नाही तर महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना संपवावे लागेल, असेही ते म्हणतात.
नांदेड शहरात कालच्या हिंसाचारानंतर आता परिस्थिती शांत आहे. पोलिसांनी काही ठिकाणी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. कालच्या हिंसाचारात काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. जमावाने केलेल्या दगडफेकीत दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले. या प्रकरणाचा तपास नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्यात सुरु आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
मुंबईतील भिंडीबाजार, नागपाडा, पायधुनी, डोंगरी, ठाण्यातील मुंब्रा, कौसा, कोपरी परिसरात रझा अकादमीच्या आवाहनावर बंदचा परिणाम दिसून आला मात्र सर्वत्र शांततापूर्ण वातावरण राहिले. या बंदचा सर्वाधिक हिंसक परिणाम नांदेड शहर आणि मालेगाव येथील सदर परिसरात दिसून आला. या दोन शहरांमध्ये 4 पोलिसांसह डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. याशिवाय दुकाने बंद करताना तोडफोड, लुटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
आतापर्यंत महाराष्ट्रभर पोलिसांनी सुमारे 14 जणांना ताब्यात घेतले असून 5 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. आज ताब्यात घेतलेल्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे. मालेगाव, नांदेड, अमरावती, वाशीम या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
महाराष्ट्र सरकारने या जिल्ह्यांतील एसपी, जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे आणि काही भागात 4 पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेषत: मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये पोलीस अत्यंत दक्ष आहेत. अमरावतीमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. (हेही वाचा: अमरावतीमध्ये कलम 144 लागू, हिंसाचाराबाबत खासदार Navneet Rana यांचे शांततेचे आवाहन- 'संजय राऊत आणि पालकमंत्र्यांनी घटनेचे राजकारण करू नये')
शुक्रवारी शुक्रवारच्या नमाजानंतर राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये आणि विशेषत: शहराच्या सदर भागात विशिष्ट समाजाच्या वस्त्यांमध्ये हाणामारी, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.