Huljanti Mahalingraya Yatra: सोलापूर येथे हुलजंती महालिंगराया यात्रेदरम्यान जमावबंदी आदेशाचे उल्लंघन; 74 जणांवर गुन्हा दाखल

यातच सोलापूर (Solapur) जिल्ह्यात जमावबंदी असतानाही हुलजंती महालिंगराया यात्रेदरम्यान (Huljanti Mahalingraya Yatra) एकत्र येऊन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 74 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Archived, edited, symbolic images)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ठिकठिकाणी जमावबंदी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. यातच सोलापूर (Solapur) जिल्ह्यात जमावबंदी असतानाही हुलजंती महालिंगराया यात्रेदरम्यान (Huljanti Mahalingraya Yatra) एकत्र येऊन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 74 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमार हा प्रकार घडला आहे. सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनाही न जुमनता भाविकांनी तशीच गर्दी केली. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश पारित करून 144 लागू करण्यात आले आहे. मात्र, दि. 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता हुलजंती महालिंगराया यात्रेत एकत्र येऊन गर्दी करुन तोंडाला मास्क न लावता, सोशल डिस्टिंसिंगचे पालन न करता शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 74 जणांविरोधात मंगळवेढा पोलिसात रात्री उशीरा गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मंदिराचे पुजारी, देवस्थानचे ट्रस्टी यांच्यासह गावातील अनेक प्रमुख माणसांचाही यात समावेश आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रातील धार्मिळ स्थळे आजपासून भाविकांसाठी खुली, सिद्धीविनायक मंदिर, शिर्डी, तुळजाभवानी मंदिरामध्ये 'हे' असतील महत्त्वाचे नियम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ठिकठिकाणी जमावबंदी आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यात यावी, असे आवाहनही राज्य सरकराने केले आहे. एवढेच नव्हेतर राज्यातील काही भागात मास्क न घातलेला व्यक्ती आढळल्यास त्याच्याकडून दंड देखील आकारला जात आहे.