Vikhroli Suicide Case: विक्रोळीच्या कन्नमवार नगर भागामध्ये 25 वर्षीय तरूणीने 22 व्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन; शरीराचे झाले दोन तुकडे

पोलिसांच्या माहितीनुसार हर्षदा मानसिक तणावाखाली होती. तिचा मृतदेह इमारती खाली असलेल्या एका दुचाकी वर आदळला आणि त्यामधून तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले असं सांगण्यात आले आहे.

Vikhroli Suicide Case: विक्रोळीच्या कन्नमवार नगर भागामध्ये 25 वर्षीय तरूणीने 22 व्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन; शरीराचे झाले दोन तुकडे
Dead Body | Pixabay.com

मुंबई (Mumbai)  मध्ये विक्रोळी (Vikroli) येथील कन्नमवार नगर (Kannamwar Nagar) भागात 25 वर्षीय तरूणीने 22 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. यानंतर तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले. या मुलीचं नाव हर्षदा तांदोळकर आहे. दरम्यान हर्षदाच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. पोलिसांनी हर्षदाचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टम साठी दिला आहे. हर्षदाला कोणता मानसिक किंवा शारीरिक त्रास होता का? याचा शोध पोलीस घेत आहेत. या तपासातून काय निष्पन्न होणार, यामधून अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

विक्रोळीच्या कन्नमवार भागामध्ये सध्या अनेक इमारतींचं काम सुरू आहे. ही घटना कन्नमवार मध्ये इमारत नंबर 97 मधील सोमवार 26 मे च्या रात्रीची आहे.या घटनेनंतर आजुबाजूच्या भागात खळबळ पसरली होती. प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार भयावह होता असं म्हटलं आहे. हर्षदाच्या शरीराचे दोन तुकडे झाल्यानंतर रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये पडला होता असं त्यांनी म्हटलं आहे. नक्की वाचा: Haryana Shocker: हरियाणाच्या पंचकुला येथे कुटुंबातील सात जणांची आत्महत्या; कारमध्ये सापडले मृतदेह, सुसाईड नोटमध्ये समोर आले धक्कादायक कारण .

सध्या हर्षदाच्या मृत्यूचं कारण accidental death report (ADR) असंचं नमूद करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात सध्या कौटुंबिक अत्याचाराच्या त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणे या 24 वर्षीय मुलीने गळफास घेत जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. वैष्णवीने पदरात 8 महिन्याचं बाळ असताना आत्महत्येसारखं पाऊल उचलल्याने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

 

Suicide Prevention and Mental Health Helpline Numbers: Tele Manas (Ministry of Health)- 14416 or 1800 891 4416, NIMHANS- + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400, Peak Mind- 080-456 87786, Vandrevala Foundation- 9999 666 555, Arpita Suicide Prevention Helpline- 080-23655557, iCALL- 022-25521111 and 9152987821, COOJ Mental Health Foundation (COOJ)- 0832-2252525.)

(The above story first appeared on LatestLY on May 27, 2025 03:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).