विजय मल्ल्या फरार आर्थिक गुन्हेगार आहे का? ED च्या अर्जावर आज न्यायालयात होणार सुनावणी
न्यायालयाने विजय मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर केल्यास ईडीला(ED) त्याची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार प्राप्त होईल.
Vijay Mallya Fugitive Economic Offender Declaration Case: भारतीय बँकांचे सुमारे 9000 कोटी रुपये बुडवून विजय मल्ल्या (Vijay Mallya) परदेशामध्ये गेला आहे. आज मुंबईच्या कोर्टामध्ये विजय मल्ल्या 'फरार आर्थिक गुन्हेगार'(Fugitive Economic Offender) आहे का? याबाबत सुनावणी होणार आहे. जर विजय मल्ल्याला आज आर्थिक गुन्हेगार म्हणून जाहीर केल्यास त्यांची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. न्यायालयाने विजय मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर केल्यास ईडीला(ED) त्याची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार प्राप्त होईल.
फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018
केंद्र सरकारने घोटाळेबाजांवर वचक ठेवण्यासाठी फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 आणला होता. अनेकदा घोटाळेबाज परदेशात पळून जाऊन न्यायालयाची कारवाई टाळण्याचा, त्यामध्ये दिरंगाई करण्याचा प्रयत्न करतात. परिणामी संबंधित राष्ट्रांकडून प्रत्यार्पणसाठी मागणी करून पुढील कारवाई केली जाते. ही प्रक्रिया खूपच वेळखाऊ आहे. म्हणूनच जर भारतामध्ये न्यायालयाने संबंधित व्यक्तीला 'आर्थिक गुन्हेगार' जाहीर केले तर त्याच्या मालमत्तेच्या जप्तीचा मार्ग मोकळा होतो. विजय माल्ल्या यांना UK High Court चा दणका, लंडनच्या आलिशान घरातूनही बेघर होणार माल्ल्या
ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन झालेल्या न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी होईल. दरम्यान विजय मल्ल्या यांना चोर म्हणणं उचित वाटत नसल्याचं नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं. सध्या विजय मल्ल्या लंडनमध्ये आहेत. त्याच्या लंडनमधील मालमत्तेवर जप्तीची परवानगी मिळाली असून सध्या भारताकडे त्यांचे प्रत्यार्पण करण्याबाबत कारवाई सुरु आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2019 08:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

