Mumbra Bypass Road Closed: दुरुस्तीच्या कामामुळे मुंब्रा बायपास रस्त्यावरून 1 एप्रिलपासून वाहनांना बंदी; पहा पर्यायी मार्ग

अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांच्या हलक्या चारचाकी वाहनांसह या प्रकल्पांसाठी दुरुस्तीचे साहित्य घेऊन जाणारी मालवाहू वाहने या निर्बंधांमधून वगळण्यात येतील, असे एका जिल्हा अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

Traffic प्रतिकात्मक छायाचित्र (Photo credits: PTI)

Mumbra Bypass Road Closed: मुंबई वाहतूक पोलिसांनी ठाण्यातील धमनी मुंब्रा बायपास आणि नाशिक महामार्गावरील महत्त्वपूर्ण सुधारणा आणि मजबुतीकरणाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक वळवण्याची घोषणा केली आहे. मुंब्रा बायपास (Mumbra Bypass Rd) रेतीबंदर जवळील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 1 एप्रिल पासून हा मार्ग बंद केला जाणार आहे. जेएनपीटी (JNPT), कळंबोलीकडून भिवंडी, नाशिक, गुजरात व उत्तर भारतात जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मुंब्रा बायपास बाह्यवळण रस्ता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. कामे पूर्ण होईपर्यंत वाहतूक सूचना लागू राहील, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.

एकाच वेळी दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांमुळे शहरातील रस्त्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंब्रा बायपास बंद झाल्यानंतर घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात चेकअप आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्तता आहे. (हेही वाचा - Online Fraud Case In Pune: ऑनलाइन नोकरीच्या शोधात पुण्यातील 64 वर्षीय माजी सैनिकाच्या खात्यातून उडाली आयुष्यभराची कमाई; काय आहे प्रकरण? जाणून घ्या)

रेतीबंदरजवळील रेल्वे उड्डाणपुलासह मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे. तसेच, खारेगाव आणि साकेत पुलांचे डांबरीकरण आणि दुरुस्तीचे काम याच कालावधीत हाती घेण्यात येणार असून मार्गांमध्ये मोठे बदल करणे आवश्यक आहे.

काम पूर्ण होईपर्यंत डायव्हर्शन प्रभावी राहतील. अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांच्या हलक्या चारचाकी वाहनांसह या प्रकल्पांसाठी दुरुस्तीचे साहित्य घेऊन जाणारी मालवाहू वाहने या निर्बंधांमधून वगळण्यात येतील, असे एका जिल्हा अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

पर्यायी मार्ग -

याशिवाय, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साकेत आणि खारेगाव खाडी पुलाची दुरुस्ती करताना नाशिक महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम होणार आहे.