Vasundhara Raje meet Ashok Gehlot: वसुंधरा राजे आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यात भेट, राजस्थानमध्ये राजकारण तापले

जयपूर येथे कॉन्स्टीट्युशन क्लबच्या अनावर कार्यक्रमासाठी हे दोन्ही नेते परस्परांना भेटले. अर्थात, राजे यांनी गहलोत यांच्यासोबत एकाच मंचावर येणे टाळले असले तरी त्यांनी त्यांची स्वतंत्र भेट मात्र घेतली.

Vasundhara Raje meet Ashok Gehlot | (Photo Credits: X)

Rajasthan Political News: विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना भारतीय जनता पक्षाला नेहमीसारखी वातावरण निर्मिती करण्यास राजस्थानमध्ये म्हणावे तसे यश अद्याप तरी आले नाही. त्यातच भाजपचा प्रमुख चेहरा आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raj) यांनी विद्यमान मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांची भेट घेतली आहे. निमित्त एका कार्यक्रमाचे असले तरी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्याचे राजकारण तापले आहे. तसेच, ही भेट आणि पाठिमागील काही काळापासून घडत असलेल्या घडामोडी पाहता भाजपमध्ये सर्वच काही अलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे. जयपूर येथे कॉन्स्टीट्युशन क्लबच्या अनावर कार्यक्रमासाठी हे दोन्ही नेते परस्परांना भेटले. अर्थात, राजे यांनी गहलोत यांच्यासोबत एकाच मंचावर येणे टाळले असले तरी त्यांनी त्यांची स्वतंत्र भेट मात्र घेतली.

दोन्ही नेत्यांचे काही संपादित (क्रॉप) केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात केवळ गहलोत आणि राजे हेच दिसत आहेत. तसेच या दोन्ही नेत्यांमध्येच भेट झाल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात मात्र या भेटीवेळी राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष डॉ. सी.पी. जोशी आणि विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड हे देखील उपस्थित होते. सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताच राजे यांच्या कार्यालयाकडून अधिकृत छायाचित्र प्रसारीत करण्यात आले. ज्यामध्ये जोशी आणि राठोड हे सुद्धा दिसत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीचा हा अधिकृत फोटो असल्याचे कार्यालयाने म्हटले आहे. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

ट्विट

ट्विट

गहलोत -राजे यांच्यातील भेटीने राजस्थान भाजपचा रक्तदाब वाढवला असला तरी काँग्रेसही पक्षांतर्गत तणाव निवळीसाठी प्रयत्नशील आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात प्रचंड राजकीय संघर्ष आहे. ज्यामुळे सन 2020 मध्ये काँग्रेस सरकार जवळपास कोसळण्याच्या स्थितीत होते. मात्र, काँग्रेस हायकमांडने वेळीच हालचाल केल्याने सरकार स्थिरावले. असे असलले तरी सरकारमधील दोन प्रमुख नेत्यांमध्ये कसा संघर्ष होईल आणि मतभेद चव्हाट्यावर येतील याची भाजप काळजी घेत आहे. राजस्थान काँग्रेसमधील फुटीकडे भाजप डोळे लावून बसली आहे.