तब्बल 39 कोटींमध्ये विकले गेले Vasudeo S. Gaitonde यांचे चित्र; स्थापन झाला नवा रेकॉर्ड
गायतोंडे (Vasudeo S. Gaitonde) हे भारतामधील प्रमुख अशा अमूर्त चित्रकारांपैकी एक मानले जातात. त्यांच्या योगदानाबद्दल 1971 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. याआधी गायतोंडे यांच्या अनेक चित्रांना मोठी रक्कम मिळाली आहे मात्र आता त्यांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे
वासुदेव एस. गायतोंडे (Vasudeo S. Gaitonde) हे भारतामधील प्रमुख अशा अमूर्त चित्रकारांपैकी एक मानले जातात. त्यांच्या योगदानाबद्दल 1971 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. याआधी गायतोंडे यांच्या अनेक चित्रांना मोठी रक्कम मिळाली आहे मात्र आता त्यांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 1961 मध्ये बनविलेले त्यांचे निळ्या रंगाचे एक ऑईल पेंटिंग 39.98 कोटींना विकले गेले आहे. 11 मार्च रोजी उशिरा, सफनार्र्ट स्प्रिंग लाइव्ह लिलावात हे पेंटिंग 5.5 मिलियन डॉलर रुपयांना विकले गेले. अशाप्रकारे हे कोणत्याही भारतीय कलाकाराच्या आतापर्यंतच्या सर्वात महागड्या चित्रांपैकी एक बनले आहे.
अशा प्रकारे झेन तत्त्वज्ञान आणि अध्यात्मिक शिकवणुकीने प्रेरित भारतीय चित्रकार वासुदेव एस. गायतोंडे यांचे चित्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वासुदेव एस. गायतोंडे यांना भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रकारांपैकी एक मानले जाते. वासुदेव गायतोंडे यांचा जन्म 1924 मध्ये नागपूर येथे झाला. 1948 मध्ये मुंबईच्या जे जे आर्ट्स स्कूलमधून त्यांनी डिप्लोमा केला. त्यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन वासुदेव यांना मुंबई प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुपमध्ये आमंत्रण देण्यात आले व त्यांनीही समूह कार्यात सक्रियपणे भाग घेतला. त्यांचे भारतात तसेच परदेशातही अनेक प्रदर्शन भरविण्यात आले. (हेही वाचा: Karnataka: महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटला; कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील मराठी भाषेतील फलक काढले)
गायतोंडे यांनी स्वत: चा विक्रम मोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, सप्टेंबर 2020 मध्ये, त्यांची 1974 साली बनवलेली ऑईल पेंटिंग सुमारे 36 कोटींमध्ये विकली गेली होती. 2015 मध्ये, क्रिस्टी या सुप्रसिद्ध संस्थेने मुंबईतील वासुदेव गायटोंडे यांच्या ऑइल पेंटिंगचा लिलाव केला होता. असे म्हणतात की या चित्रकलेने भारतीय कलेच्या जगात विक्रम स्थापन केला. ते चित्र सुमारे 30 कोटी रुपयांना विकले गेले होते. सार्वजनिक लिलावात विक्री झालेले जगातील सर्वात महागडे पेंटिंग हे Leonardo da Vinci चे Salvator Mundi हे आहे, ज्याची 1917 मध्ये, $450.3 मिलियन मध्ये विक्री झाली होती.