Vasant More On MNS: ज्या मुस्लिमांशी नाळ जोडली, त्यांच्याच दारात जाऊन भोंगे वाजवायचे का? मनसेच्या भूमिकेवर वसंत मोरे भावूक
पाठीमागील 27 वर्षे मी राज ठाकरे आणि पक्षासोबत आहे. या काळात मुस्लिमांशी (Muslims) आपली नाळ जोडली गेली आहे. आता त्यांच्याच दारात जाऊन भोंगे वाजवायचे आणि काहीतरी करायचे का? असा सवाल उपस्थित करत वसंत मोरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
पक्षाने केलेल्या कारवाईमुळे पुणे (Pune) मनसेचे (MNS) वसंत मोरे (Vasant More) नाराज झाले आहेत. पाठीमागील 27 वर्षे मी राज ठाकरे आणि पक्षासोबत आहे. या काळात मुस्लिमांशी (Muslims) आपली नाळ जोडली गेली आहे. आता त्यांच्याच दारात जाऊन भोंगे वाजवायचे आणि काहीतरी करायचे का? असा सवाल उपस्थित करत वसंत मोरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला आपण राज साहेबांना (ठाकरे) आपण मेसेज केला आहे. परंतू, अद्याप त्यांचा निर्णय आला नाही, असेही त्यांनी सांगितले.
वसंत मोरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे पुण्यातील आणि खास करुन कोंडवा येथील मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केले आहे. वसंत मोरे यांच्या समर्थनार्थ कात्रज गावठाण येथील कार्यालयाबाहेर मुस्लिम समाजाने सत्याग्रह सुरु केला आहे. वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांकडे आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, राज ठाकरे यांनी भाषण केल्यानंतर मला जी भीती वाटत होती तेच झाले. पाठिमागील अनेक वर्षांपासून मुस्लिम बांधव माझ्या सोबत आहेत. साधारण पासून 2007 पासून आम्ही सगळे सोबत काम करतो आहोत. कधीच हिंदू-मुस्लिम असे अंतर त्यात आले नाही. आता नाळ इतकी घट्ट झाल्यानंतर त्यांच्या दारात जाऊन भोंगे वाजवायचे का? काहीतरी कारण काडून, भूमिका घेऊन त्यांच्यासोबत वाद करत बसायचे का? हीच भूमिका मी स्पष्टपणे आणि तितक्याच प्रखडपणे मांडली. त्यानंतर ज्याची भीती होती तेच घडले, असे मोरे यांनी बोलून दाखवले. (हेही वाचा, Vasant More: तात्या अजूनही ठामच! राज ठाकरे काय भूमिका घेणार?)
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मला ज्याची भीती होती तेच झालं. हे सगळे मुस्लीम बांधव २००७ पासून माझ्यासोबत आहेत. एका हिंदू व्यक्तीच्या पाठिशी ते इतकी वर्षे उभे आहेत. आमच्याकडे हिंदू-मुस्लिम असा विषयच नाही. या सगळ्यांशी माझी नाळ जोडली गेली आहे. आता मी यांच्या दारात जाऊन भोंगे वाजवायचे, काहीतरी भूमिका घेऊन त्यांच्याशी वाद घालायचे का? हीच गोष्ट मी परखडपणे सांगितली. त्यानंतर मला ज्याची भीती होती, तेच झालं, असे वसंत मोरे यांनी म्हटले.
आपणास पुणे शहर अध्यक्ष पदावरुन हटवावे असे मी राज ठाकरे यांना आगोदरच म्हटले होते, असे मोरे यांनी कालच म्हटले होते. यावरही प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की, पदावरुन तडकाफडकी करताना हकालपट्टी हा विषय मला फार वेदना देणारा ठरला. मी महिनाभरात पद सोडेण असे राज साहेबांना स्व:ता सांगितले होते. असे असतानाही पदावरुन थेट हाकालपट्टी करावी ही बाब मनाला लागली. कार्यकर्त्यांच्याही मनाला ही बाब खूप लागली असल्याचे मोरे यांनी बोलून दाखवले.
पाठिमागी 27 वर्षे पक्षात सर्वांना सोबत घेऊन काम केले. जे कार्यकर्ते माझ्यासोबत मोठे झाले त्या कार्यकर्त्यांमध्ये आणि माझ्यात दुफळी निर्माण केली जात आहे. पक्षाच्या निर्णयामुळे काल मला रात्रभर झोप लागली नाही. उद्या मी अपक्ष म्हणून जरी लोकांच्या समोर गेले तरी लोक मला निवडून देतील. पण या लोकांशी असलेले संबंध मी तोडू शकत नाही, अशी सलही मोरे यांनी बोलून दाखवली.