वंचित बहुजन आघाडी-एमआयएम युती कायम, काँग्रेस सोबत जाणार नाही: प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर सोमवारी (9 सप्टेंबर 2019) म्हणाले, असदूद्दीन ओवैसी हे एमआयएम पक्षाचे नेते आहेत. त्यांचा आणि आपला संवाद सुरु असून आजही वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम ही युती कायम आहे. इतरांनी कुणी ही युती तुटल्याचा दावा केला असला तरी आम्ही त्याकडे लक्ष देऊ इच्छित नाही

Prakash Ambedkar | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Maharashtra Assembly Elections 2019: कोणाकडूनही कोणत्याही प्रकारचे दबावाचे राजकारण घपवून घेतले जाणार नाही, असा रोखठोक इशारा देत आजही एमआयएम (MIM) पक्षासोबत आपली युती कायम असल्याचे वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) प्रणेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. एमआयएम पक्षाने वंचित बहुजन आघडीपासून फारकत घेतल्याचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे अॅड. प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतातय याबाबत उत्सुकता होती. इम्जियाज जलील हे वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद येथील खासदार आणि एमआयएम पक्षाचे नेते आहेत.

आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर सोमवारी (9 सप्टेंबर 2019) म्हणाले, असदूद्दीन ओवैसी हे एमआयएम पक्षाचे नेते आहेत. त्यांचा आणि आपला संवाद सुरु असून आजही वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम ही युती कायम आहे. इतरांनी कुणी ही युती तुटल्याचा दावा केला असला तरी आम्ही त्याकडे लक्ष देऊ इच्छित नाही. विधानसभा निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही युती कायम राहिल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही आंबेडकर या वेळी म्हणाले. (हेही वाचा, वंचित बहुजन आघाडी-एमआयएम पक्षात विधानसभा निवडणुकीपूर्वी फूट)

दरम्यान, अॅड. आंबेडक यांनी सांगितले की, असदूद्दीन औवैसी यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी आपल्याकडे दिली आहे, असा दवाही आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, काँग्रेस हे भाजपला पूरक राजकारण करत असल्याचाही आरोप आंबेडकर यांनी केला. या वेळी बोलतान आपण काँग्रेस सोबत जाण्याच्या मनस्थितीत नसल्याचेही त्यांनी सांगितले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif