परळीतील वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी, बीडमध्ये खळबळ
50 लाख रुपये द्या अन्यथा आरडीएक्सने मंदिर उडवून देवू असे धमकी देणारे पत्र आले आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे राजेश देशमुख हे सचिव आहेत त्यांना एक पत्र मिळालं आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं बीड (beed) जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर (Parli Vaidyanath Jyotirlinga temple) आरडीएक्स (rdx) लावून उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मंदिर समितीकडे एका गुंडाने 50 लाख रुपयाची (50 lakh threatened letter) खंडणी मागितली आहे. या पत्रामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आहेत. 50 लाख रुपये द्या अन्यथा आरडीएक्सने मंदिर उडवून देवू असे धमकी देणारे पत्र आले आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे राजेश देशमुख हे सचिव आहेत त्यांना एक पत्र मिळालं आहे. पत्रामध्ये वैद्यनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आले आहेत. 50 लाख रुपये द्या अन्यथा आरडीएक्सने मंदिर उडवून देऊ असा मजकूर लिहलेला आहे.
तसेच मजकुरात असे ही लिहिले आहे की मी फार मोठा नामी गुंड आहे व ड्रग माफिया असून गावठी पिस्तूल धारक आहे. मला माझ्या तातडीची गरज भागवण्यासाठी आपल्या मंदिर संस्थांकडून 50 लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच आपण मला वरील रक्कम माझ्या खालील पत्त्यावर ताबडतोब पोस्ट करावी, अन्यथा आपले मंदिर संस्थान माझ्याकडील आरडीएक्सने उडवून लावेल, अशी धमकीच या गुंडाने दिली आहे. तसंच, ही धमकी समजण्याची घोडचुक करू नये ही विनंती, असंही हा गुंड पत्रात म्हणत आहे. (हे ही वाचा अण्णा हजारेंना रुग्णलयातुन डिस्चार्ज, प्रकृती चांगली असल्याची डॉक्टरांकडून माहिती.)
मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांनी परळी शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आगे. मंदिराला असे धमकीचे पत्र पहिल्यांदाच आले असे राजेश देशमुख यांनी सांगून याच्या चौकशीची मागणी शासनाकडे केली आहे. 20 वर्षापूर्वी मंदिर उडवण्याची धमकी अतिरेक्यांनी दिली होती.
शुक्रवारी आलेले पत्र कोणी पाठविले? का पाठविले याची चौकशी व्हायला हवी, कडक पोलिस सुरक्षा द्यावी अशी मागणी राजेश देशमख यांनी एका पत्राद्वारे पोलीसांकडे केली आहे. या प्रकरणाची चौकशी चालू आहे. गुन्ह्याची नोंद परळी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. शुक्रवारी आलेले पत्र कोणी पाठविले? का पाठविले याची चौकशी व्हायला हवी, कडक पोलिस सुरक्षा द्यावी अशी मागणी राजेश देशमख यांनी एका पत्राद्वारे पोलीसांकडे केली आहे.