IPL Auction 2025 Live

UP Population Control Bill: 'उत्तर प्रदेश-बिहारची वाढती लोकसंख्या ही इतर राज्यांसाठी बनत आहे समस्या'- शिवसेना नेते Sanjay Raut

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांनी काही दिवसांपूर्वी 'उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण 2021-2030' (Population Policy 2021-2030) जाहीर केले.

Sanjay Raut | (Photo Credit: ANI)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांनी काही दिवसांपूर्वी 'उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण 2021-2030' (Population Policy 2021-2030) जाहीर केले. या दरम्यान, ते म्हणाले होते की वाढती लोकसंख्या ही समाजातील असमानता आणि इतर समस्यांचे मूळ आहे. लोकसंख्या नियंत्रण ही समाजाच्या प्रगतीची प्राथमिक गरज आहे. आता शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यूपी सरकारच्या या लोकसंख्या धोरणाला सशर्त पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले की, त्यांचा पक्ष यूपीमध्ये लागू केलेल्या लोकसंख्या धोरणाच्या प्रभावाचे विश्लेषण करेल आणि त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर चर्चेसाठी त्यावर विचार करेल.

शिवसेने नेते संजय राऊत असेही म्हणाले की, फक्त निवडणुका जवळ आल्यामुळे हे बिल सादर केले जाऊ नये. ते पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकसंख्येचा परिणाम इतर राज्यांमध्येही होत आहे. गेल्या रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसंख्या धोरण सादर करताना सांगितले की,  यामुळे राज्यातील लोकसंख्या वाढ रोखण्यात मदत होईल. यासह माता व बालमृत्यू दरही कमी करण्यात येणार आहेत.

लोकसंख्या धोरणानुसार, जो कोणी उत्तर प्रदेशातील दोन मुलांच्या धोरणाचे उल्लंघन करेल, त्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविणे, सरकारी नोकरीसाठी अर्ज करणे, पदोन्नती देणे आणि कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान मिळण्यास मनाई केली जाईल. दुसरीकडे, आसाम सरकारनेही असेच लोकसंख्या धोरण आणण्याविषयी भाष्य केले आहे. मात्र, विरोधी पक्षांनी या प्रस्तावाला निवडणूक प्रचार असे म्हणत विरोध दर्शविला आहे. त्याचबरोबर सपा आणि कॉंग्रेसनेही या धोरणासंदर्भात यूपी सरकारचा विरोध केला आहे. (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्टीकरण, जयंत पाटील, नवाब मलिक यांनी दिली माहिती)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंडिया टीव्हीला सांगितले होते की, त्यांचा पक्ष यूपीमधील 50 ते 60 जागांवर निवडणूक लढवेल आणि यूपी निवडणुकीत शिवसेनेच मुद्दा ‘हिंदुत्व’ असेल. राम मंदिर प्रकरणाबाबत शिवसेना नेते म्हणाले की, राम मंदिराचा मुद्दा हा आता राजकारणाचा मुद्दा नाही व भाजपनेही तो आणू नये ना कुणीही. आता यूपीला विकासाच्या मुद्यावर पुढे घेऊन येणे गरजेचे आहे व आम्ही तेच करू.