Unseasonal Rain: कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला अवकाळी पावसाची हजेरी, नागरिकांना उन्हापासून दिलासा
राज्यात तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण होऊन गेले होते. त्यामुळे अवकाळी पावसाने गारवा निर्माण केला आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात अनेक भागांत आज अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने दुपारी हजेरी लावली. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून अंगाची लाहीलाही होत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. तीन दिवसांपासून पारा चाळीशीच्या पार गेल्याने नागरिकांची अक्षरशः लाहीलाही सुरू आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आज जिल्ह्यातील हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली. यावेळी काही ठिकाणी गारांचाही वर्षाव झाला. (हेही वाचा - Maharashtra: महाराष्ट्रातील मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे आठवडाभरात 10 जणांचा मृत्यू)
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, दत्तवाड, हेरवाड, चिंचवाडसह परिसरात चांगल्या पावसाची नोंद झाली. शिरोळमध्ये आठवडी बाजारात मोठी तारांबळ उडाली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. सांगलीमध्ये सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह दुपारी पावसाला सुरुवात झाली. काही भागांमध्ये गारांचा वर्षाव सुद्धा झाला.
राज्यात तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण होऊन गेले होते. त्यामुळे अवकाळी पावसाने गारवा निर्माण केला आहे. दुसरीकडे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाई तालुक्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना सुद्धा घडल्या.
[Poll ID="null" title="undefined"]तील धाराशिव, लातूर जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. गेल्या 24 तासांमध्ये मालेगावमध्ये राज्यातील उच्चांकी म्हणजेच 42.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती.
(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2024 06:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

