Unnatural Sex with Cow: धक्कादायक! पुण्यात गायीसोबत अनैसर्गिक सेक्स; 22 वर्षीय तरुणाला अटक
Cow (Photo Credits: (Pixabay) Representational Image Only

दररोज स्त्रियांवरील अत्याचाराची (Rape) अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येतात. काही दिवसांपूर्वी एका घोरपडीवर बलात्कार झाल्याचे समोर आले होते. आता लोणावळ्यातील कुसगाव येथे एका 22 वर्षीय तरुणाने गायीचे लैंगिक शोषण (Rape On Cow) केले आहे. या प्रकरणी रुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे मिररने याबाबत वृत्त दिले आहे. आरोपीच्या शेजाऱ्याला तो गायीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याने ही घटना उघडकीस आली. दीपक शिवाजी राजिवडे असे आरोपीचे नाव आहे.

घडल्या प्रकारानंतर गायीच्या मालकाने तक्रार नोंदवली होती, त्यानंतर आता राजिवडेला अटक करण्यात आली आहे. आरोपानुसार या तरुणाने गायीसोबत अनैसर्गिक सेक्स केला आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 377 (कोणत्याही पुरुष, स्त्री किंवा प्राण्याशी अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता गायीच्या वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत.

कुसगाव येथील साठे वस्ती परिसरातील गोठ्यात बुधवारी पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. राजीवाडेविरुद्ध बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर लगेचच त्याला अटक करण्यात आली. या बाबतचा पुढील तपास सुरू आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गाईची वैद्यकीय तपासणी करून स्वॅब रिपोर्ट देण्यासाठी कामशेत, वडगाव मावळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना गायीचे लैंगिक शोषण झाले की नाही हे शोधण्यास सांगितले आहे.

दरम्यान, एप्रिलमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेत लखनऊ पोलिसांनी यूपीच्या राजधानीत एका व्यक्तीला गायीसोबत अनैसर्गिक सेक्स केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्या घटनेमध्येही शेजाऱ्यांपैकी एकाने माजिदला गायीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले तेव्हा ही घटना उघडकीस आली. तक्रारदार जितेंद्र यादव यांनी आरोप केला होता की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक माणूस आपल्या गायीसोबत सेक्स करताना दिसला आहे. (हेही वाचा: Unnatural Sex Case: धक्कादायक! 19 वर्षीय कैद्याने ठेवले 20 वर्षीय कैद्यासोबत अनैसर्गिक शारिरीक संबंध, आर्थर रोड तुरुंगातील घटना)

लखनऊच्या सरोजनी नगरचे स्टेशन हाऊस ऑफिसर संतोष कुमार आर्य यांनी सांगितले की, आरोपीचा शेजारी त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना त्याला आपल्या गायीसोबत कोणीतरी सेक्स करताना दिसले. त्यानंतर त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.