मालेगाव: विवाहित महिलेसोबत अविवाहित तरुणाची आत्महत्या; प्रेमाला होणाऱ्या विरोधास कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

आत्महत्या करणाऱ्यांपैकी महिला विवाहित असून तरुण अवविवाहीत असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या केलेले प्रेमीयुगल शेजारी राहत असून त्यांचे एकमेकांवर प्रेम जुळले होते.

Hanging (Photo Credits: Representative Image)

प्रेमाला विरोध होत असल्यामुळे प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्यांपैकी महिला विवाहित असून तरुण अवविवाहीत असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या केलेले प्रेमीयुगल शेजारी राहत असून त्यांचे एकमेकांवर प्रेम जुळले होते. याआधी त्यांनी दोनवेळा घरातून पळ काढला होता. परंतु, पोलिसांच्या मदतीने त्यांना घरी आणले गेले. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेमीयुगुल तिसऱ्यांदा घरातून पळून गेले होते. मात्र, त्यांच्या प्रेमाला समाजातून विरोध होत असल्याने त्यांनी घरी येऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. प्रेमीयुगुलांनी केलेल्या धक्कादायक कृत्यामुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे

राधा आढाव (28) असे विवाहितेचे नाव असून तिला दोन मुले आहेत. तर सुरेश पवार (24) हा अविवाहित असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच दोघेही मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील रहवासी आहेत. राधा आणि सुरेश यांच्यात गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंध जुळले होते. यातून हे दोघे प्रेमीयुगुल 28 नोव्हेंबर रोजी घरातून पळून गेले होते. दरम्यान, बुधवारी रात्री शिरपूरला घरी परत आले. घरी परत आल्यानंतर तिने तिच्या दोन्ही मुलांना सासऱ्याकडे सोडले. गुरुवारी सकाळी 11 वाजले तरी राधाने घराचे दरवाजा उघडला नव्हता. यामुळे शेजारी राहणाऱ्या नागरिकांना शंका आली. काहीवेळेनंतर त्यांनी घराचे दार तोडण्याचा निर्णय घेतला. नागरिकांनी दरवाजा तोडल्यानंतर राधा आणि सुरेश या प्रेमीयुगुलांनी गळफास घेतल्याचे त्यांना समजले. हे देखील वाचा- नाशिक: त्र्यंबकेश्वर येथील धबधब्यात 3 विद्यार्थी बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांचा शोध सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा आणि सुरेश यांच्यात प्रेम प्रकरण जुळले होते. यातून त्यांनी दोनदा घर सोडले होते. परंतु, आपल्या प्रेमाला समाज विरोध करत आहे. याला वैतागून दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शिरपूर पोलीस अधिक चौकशी केरत आहे.