University Final Year Examination: विद्यापीठ अंतिम वर्ष परिक्षांसाठी बहुतांश विद्यापीठांनी मागितली 31 ऑक्टबर पर्यंतची मुदत- उदय सामंत

आपले अंतीम मत सर्व विद्यापीठे लवकरच देतील. विद्यापीठांचे अंतिम मत अजमावून येत्या 2 सप्टेंबरला आपतकालीन व्यवस्थापन बैठक बोलावली जाईल. या बैठकीच्या माध्यमातून यूजीसीकडे परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी विनंती केली जाईल.

Uday Samant | (Photo Credits: Twitter)

न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परिक्षा (University Final Year Examination) घेण्यासाठी राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ मागितीली आहे. तसेच, विद्यापीठांनी आपले म्हणने राज्य सरकारला कळविण्यापूर्वी विचार करण्यासाठी आणखी एक दिवसाची मुदत मागितल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री (Higher and Technical Education Minister) उदय सामंत (Uday Samant) यांनी म्हटले आहे. विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत उदय सामंत यांनी आज (31 ऑगस्ट) एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत ते बोलत होते. कोरोना व्हायरस संसर्ग (Coronavirus), लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास राज्य सरकारांनी असमर्थता दाखवली होती.

उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा कमी गुणांची परीक्षा घेण्यात येईल. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळू शकेल. परीक्षेसाठी आपले आरोग्य, जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडू नये यासाठी राज्य सरकार दक्ष आहे. त्यासाठी नेमलेल्या समितीने त्याबाबत अहवालही दिला आहे. तसेच, विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा देता यावी यासाठी कुलगुरुंचही एकमत असल्याचे उदय सामंत म्हणाले. (हेही वाचा, UGC Final Year Examinations Case: विद्यापीठांच्या अंंतिम वर्षाच्या परीक्षा होणार, राज्य सरकारने UGC शी सल्लामसलत करून तारखा ठरवा; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यासाठी बहुतांश विद्यापीठांनी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ मागितली आहे. आपले अंतीम मत सर्व विद्यापीठे लवकरच देतील. विद्यापीठांचे अंतिम मत अजमावून येत्या 2 सप्टेंबरला आपतकालीन व्यवस्थापन बैठक बोलावली जाईल. या बैठकीच्या माध्यमातून यूजीसीकडे परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी विनंती केली जाईल.

दरम्यान, परीक्षेसाठी विद्यार्थी आणि पालकांना तसेच यंत्रणेला कमीत कमी त्रास होईल यासाठी प्रयत्न केले जातील. राज्य सरकार विद्यार्थी, पालकांचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही उदय सामंत या वेळी म्हणाले.