Raosaheb Danve In Mumbai Local: रावसाहेब दानवे यांचा मुंबई लोकल प्रवास, म्हणाले 'रेल्वे एअरपोर्टसारखी बनवणार'

या प्रवासावेळी त्यांनी सहप्रवासी आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Raosaheb Danve | (Photo Credit : Facebook)

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve) यांनी मंत्रीपदावर नियुक्ती झाल्यानंतर प्रधमच मुंबई लोकल (Mumbai Local) ट्रेनमधून प्रवास (Raosaheb Danve In Mumbai Local) केला. या प्रवासावेळी त्यांनी सहप्रवासी आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, मुंबईतील लोकल स्टेशन आणि एकूच रेल्वेचा विकास करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) एअरपोर्टच्या धर्तीवर बनविण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचेही रावसाहेब दानवे या वेळी म्हणाले. रावसाहेब दानवे हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत.

रावसाहेब दानवे यांनी या वेळी सांगितले की, मुंबई सीएसटी आणि मुंबईतील गर्दीची म्हणून ओळखली जाणारी जी स्टेशन आहेत त्यांचा वेगाने विकास आणि विस्तार करण्याचे केंद्र सरकारच धोरण आहे. सध्या त्यावर काम सुरु आहे. दादर रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करताना 'डेक' आणि पूल उभारणीवर भर देण्यात येणार असल्याचेही दानवे यांनी सांगीतले.

दरम्यान, इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (आयआरएसडीसी) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि ठाणे या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. या विकासकामांची पाहनी दानवे यांनी केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif