BMC च्या बँक खात्यात 58 हजार कोटी; तरीही मुंबई दरवर्षी तुंबते ,नितीन गडकरी यांचा शिवसेनेला टोला

या वेळी आपल्या भाषणातून गडकरींनी शिवसेनेला टोला लगावत यंदाच्या पावसात मुंबई व मुंबईकरांची झालेली परवड मांडली.

नितीन गडकरी (Photo Credits: PTI)

शुक्रवारी,गोराई (Gorai) येथील मॅन्ग्रोव्ह मैदानाच्या भूमी पूजन सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी खास हजेरी लावली होती. या वेळी आपल्या भाषणातून गडकरींनी शिवसेनेला (Shivsena) टोला लगावत यंदाच्या पावसात मुंबई व मुंबईकरांची झालेली परवड मांडली. महापालिकेच्या (BMC) बँक खात्यात तब्बल 58 हजार कोटी रुपये असून सुद्धा मुंबईची दरवर्षी तुंबई का होते असा सवालही त्यांनी केला. वास्तविक मागील पाच वर्षांपासुन शिवसेना ही भाजपा युतीसोबत मुंबई मध्य कार्यरत आहेत, तसेच येत्या निवडणुकीतही शिवसेना- भाजप एकत्र आहेत, त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गडकरी यांच्या विधानावरून बऱ्याच चर्चा रंगत आहेत.

यंदा पावसामुळे मुंबईत कित्येकवेळा पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या.याविषयी बोलताना गडकरी यांनी मुंबई महापालिकेला सुद्धा टोला लगावला. पालिकेच्या खात्यात इतके पैसे आहेत त्याचा उपयोग करून समुद्रात टाकलेल्या कचऱ्यापासून पुनर्निर्मिती करण्यावर भर द्यायला हवा. यामध्ये गरज असल्यास खाजगी संस्थांची सुद्धा मदत घ्यावी असाही सल्ला गडकरींनी दिला.मुंबईला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे याचा वापर करून आपल्याला वाहतुकीचे मार्ग बनवता येतील यासाठी व्हेनिस, इटली सारख्या भागातील तज्ज्ञ मंडळींची मदत घ्यायला हवी असे म्हणत गडकरी यांनी आपल्याला मुंबईत वॉटर टॅक्सी सुरु करायची असल्याचा मानस बोलून दाखवला. सोलापूर: राष्ट्रगान सुरु असताना नितीन गडकरी यांना भोवळ

दरम्यान, गडकरी यांच्या विधानावर शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया देत यावर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडून उत्तर दिले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.