नितीन गडकरी यांनी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या सरकार बद्दल केलं भविष्यवाणी म्हणाले फार काळ नाही टिकणार सरकार

असं भाकीत नितीन गडकरी

Nitin Gadkari | (Photo Credit-PTI)

Maharashtra Government Formation:  महाराष्ट्रामध्ये सत्तासंघर्ष शिगेला असताना आता लवकराच शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता काही वेळातच याची औपचारिक घोषणा होणार आहे. आज एएनआय सोबत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तिन्ही पक्षांमधील आघाडीच्या एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यावर भाष्य केलं आहे. कॉंग्रेस, एनसीपी आणि कॉंग्रेस पक्षांमध्ये वैचारिक मतभेद आहेत. सरकार बनवलं तरीही ते टिकणार नसल्याची भविष्यवाणी केली आहे.

नितीन गडकरी यांनी भाजपाला सत्तेपासून कॉंग्रेस, एनसीपी आणि शिवसेना एकत्र आल्याचं म्हटलं आहे. या पार्टींमध्ये वैचारिक आधार नाही. त्यामुळे राज्याला स्थिर सरकार मिळण्याची शक्यता आहे. भाजपा आणि शिवसेनेची युती हिंदुत्त्वाच्या विचारधारणेवर अवलंबून आहे. आता दोघांमध्ये तणावाचे संबंध असले तरीही विचारधारणेमध्ये बदल नाही. पण शिवसेना, भाजपाची युतीशिवाय राज्यात सरकार येणं हे महाराष्ट्रासह देशासाठी नुकसानीचं ठरणार आहे.

ANI Tweet

मतदारांनी भाजपा - शिवसेनेला कौल दिला आहे. राज्यात भाजपाला 105 तर शिवसेनेच्या 56 जागांवर मतदारांचा कौल मिळाला आहे. आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस एकत्र येऊनआता सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif