Jalna Lightning Strikes: जालाना जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू,गावात शोककळा
पावसादरम्यान जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे
Jalna Lightning Strikes: राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे. जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा रिमझिम सुरुच आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान पावसादरम्यान जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.( हेही वाचा- बारामती तालुक्यात अंगावर वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी जिल्ह्यातील ठिकठिकाणी भागात पावसाने थैमान माजवले होते. दरम्यान अंगावर वीज कोसळून एका वीस वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. भोकरदन तालुक्यातील कुंभार गाव या घटनेने हादरले आहे.अर्चना विशाल दाभाडे असं वीज कोसळून मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. अर्चना सायंकाळी शेतात काम करत होते. गारपीठा पडत असल्याने घरच्या रस्त्यावरून येत असताना अचानक विजांचा कडकडाट आवाज येऊ लागल्या आणि वीज अर्चनाच्या अंगावर कोसळली.
गावकऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी, अर्चनाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु वेळे निघून गेल्याने अर्चना यांचा आधीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे एका ३८ वर्षीय शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सिपोरा बाजार गावात घडली आहे. शिवाजी गणपत कड असं मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सायंकाळी ७ वाजल्याच्या सुमारास शेतात असताना वादळी वाऱ्यासह गारपीट सुरु असताना अचानक यांच्यावर वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही घटनेमुळे जिल्हात शोककळा पसरली आहे.