IPL Auction 2025 Live

Magnetic Maharashtra 2.0: दक्षिण कोरियन कंपनी 'इस्टेक' पुण्यातील रांजणगाव मध्ये करणार 120 कोटी रुपयांची गुंतवणूक; सुभाष देसाई यांची माहिती

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 (Magnetic Maharashtra 2.0) अंतर्गत हा करार करण्यात आला आहे. या करारामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. यासंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी माहिती दिली आहे.

Subhash Desai (Photo Credits: Facebook)

Magnetic Maharashtra 2.0: दक्षिण कोरियामधील 'इस्टेक' (Electronics System Design) कंपनी पुण्यातील (Pune) रांजणगाव (Ranjangaon) मध्ये 120 कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment) करणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 (Magnetic Maharashtra 2.0) अंतर्गत हा करार करण्यात आला आहे. या करारामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. यासंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी माहिती दिली आहे.

मागील आठवड्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांशी सामंजस्य कराराने मॅग्नेटिक महाराष्ट्र मधील दुसऱ्या टप्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी ठाकरे सरकारने परेदशातील 12 कंपन्यांशी 16 हजार कोटींचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. यात दक्षिण कोरियामधील 'इस्टेक' कंपनीचाही समावेश आहे. (हेही वाचा - Tillari Conservation Reserve Area: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी परिसर 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित)

मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या दुसऱ्या टप्प्यात चीनच्या चीन कंपन्यांचादेखील समावेश होता. परंतु, भारत-चीनमधील झटापटीनंतर ठाकरे सरकारने या तीन कंपन्यासोबत झालेल्या तब्बल 5000 कोटी रुपयांच्या करारास स्थगित दिली होती. भारत-चीन झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर चीनी कंपन्यांसोबत करण्यात आलेल्या सर्व करारांना स्थगिती देण्यात आली होती.

हेंगली इंजिनिअरींग, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन्स जेव्ही विद फोटॉन आणि ग्रेट वॉल मोटर्स या कंपन्या पुणे जिल्ह्यातील तळेगावमध्ये गुंतवणूक करणार होत्या. डेटा सेंटर, मॅन्युफॅक्चरींग, फूड प्रोसेसिंग, ऑटोमोबाईल्स क्षेत्रातील 12 बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणूकीमुळे राज्यात सुमारे 90 हजार रोजगार निर्माण होण्याची शक्यता असल्याचं उद्योग विभागाने सांगितलं होतं.