Narayan Rane on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे लवकरचं संजय राऊत यांच्याप्रमाणे जेलमध्ये जाणार; नारायण राणे यांचा गोप्यस्फोट

उद्धव ठाकरे कधीच खरं बोलत नाहीत, उद्धव ठाकरे म्हणजे लबाड लांडगा, अशीही जहरी टीकाही नारायण राणे यांनी मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

Narayan Rane And CM Uddhav Thackeray (Twitter)

Narayan Rane on Uddhav Thackeray: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेही जेलमध्ये जाणार, असा गोप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे कधीच खरं बोलत नाहीत, उद्धव ठाकरे म्हणजे लबाड लांडगा, अशीही जहरी टीकाही नारायण राणे यांनी मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. दरम्यान, बुधवारी उद्धव ठाकरे यांनी गटनेत्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. ठाकरे यांनी केलेल्या या टीकेला नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत प्रत्त्यूत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागताना नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे निराशेच्या भावनेतून उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा उद्धव ठाकरे 6 वर्षाचे होते. मी मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरेंना वाटलं ते देखील मुख्यमंत्री होऊ शकतात. मला मंत्रीपद मिळू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांना 10 वेळा फोन केला, अशी टीकाही यावेळी नारायण राणे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी पक्ष वाढीसाठी कधी संघर्ष केला का? गद्दारांना सत्तेचं दूध पाजलं असे उद्धव म्हणतात, मग सत्तेत असताना खोक्याच्या रुपात तूप कोणी खाल्ल? हिंदुत्वासाठी कोणतं काम केलं…? असा सवालही नारायण राणे यांनी केला आहे. लांडगा लबाड, खोटारडा असतो. म्हणून मी त्याला लबाड लांडग्याची उपमा दिलीय. बाप पळवणाऱ्याची औलाद फिरतेय असं उद्धव बोलले. पण बापाचे विचार अन् ध्येय धोरण राबवले नाही, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.

नारायण राणे पुढे म्हणाले की, लवकरच संजय राऊत यांच्या बाजूला जेलमध्ये उद्धव ठाकरे बसतील. भाजप नेत्यांवर किंवा मुख्यमंत्र्यांवर वाकडी नजर टाकली तर डोळे ठेवणार नाही, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement