Uddhav Thackeray & Oath of Pohradevi: उद्धव ठाकरे यांनी घेतली पोहरादेवीची शपथ, अमित शाह, भाजपावर हल्लाबोल

शिवसेना पक्षात झालेल्या अभूतपूर्व फूटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता पुरते सावरले आहेत. त्यांनी आता पक्षबांधणीवर जोरदार काम सुरु केले आहे. सध्या ते दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळ येथील पोहरादेवी दर्शन घेतल्यावर त्यांनी पक्षनेत्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली.

Uddhav Thackeray | (Photo Credit: ANI)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना पक्षात झालेल्या अभूतपूर्व फूटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता पुरते सावरले आहेत. त्यांनी आता पक्षबांधणीवर जोरदार काम सुरु केले आहे. सध्या ते दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळ येथील पोहरादेवी दर्शन घेतल्यावर त्यांनी पक्षनेत्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच, विधानसभा निवडणूक 2019 पूर्वी झालेल्या युतीच्या जागावाटपात ठरलेल्या मुद्द्यांचा पुन्हा उल्ले करत ठाकरे म्हणाले, 'पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो, शिवसेना आणि भाजप यांच्यात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद ठरले होते.'

भाजपने जर ठरल्याप्रमाणे अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेतले असते. तर आज भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलण्याची आणि बाहेरून आलेल्यांची सरबराई करावी लागली नसती. सुरुवातीला किंवा शेवटी भाजपचे अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद होऊन गेले असते. आता दोन्ही पक्ष सत्तेत असते. पण, ते ठरल्याप्रमाणे वागले नाहीत. आता अखंड पाच वर्षे मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालेच नाही. शिवसेना-भाजप युतीतून मी बाहेर पडलो नाही. तर, मला युतीतून बाहेर ढकलण्यात आल्याचेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Uddhav Thackeray Vidarbha Tour: उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर; बैठकांचा धडाका)

बंद दाराआड काय घडले हे मी आई-वडीलांची शपथ घेऊन या आधीच सांगितले आहे. आजही मी पोहरादेवीला आलो आहे. पोहला देवीच शपथ घेऊन आजही मी सांगतो की, अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाबाब ठरले होते. विद्यमान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ते वचन पाळलं असतं आणि आमच्यात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद घेतले असते तर आज भाजप किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहायला मिळाला असता. निष्ठावंतांना बाहेरून आलेल्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.