शिवसेना आणि भाजप युती आहे की तुटली? पहा काय म्हणाले शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे

भाजप पक्ष खोटारडा असल्याचा मोठा आरोप त्यांनी आज केला आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter /ANI)

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर अनेक आरोप केले आहेत. भाजप पक्ष खोटारडा असल्याचा मोठा आरोप त्यांनी आज केला आहे.

ते म्हणाले, “जोपर्यंत फडणवीस त्यांचा खोटारडापणा स्वीकारत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्याशी बोलणारी नाही. मला असला खोटा नेता नको आहे. आणि यापुढे जर शिवसेना आणि भाजपमध्ये युती ठेवायची असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी आधी शपथ घ्यावी की मी खोटं बोलणार नाही."

तसेच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील निशाणा साधत एक सवाल केला आहे. ते म्हणाले, "आता मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारायचं आहे की खोटं बोलणारी माणसं तुमच्या हिंदुत्वात बसत का?"

"जे ठरलं होता तेच मी मागितलं आहे. आमच्या घराण्याने कधीही खोटं बोलून काम केलेलं नाही. खोटं बोलायला मी भाजपावाला नाही, त्यामुळे यापुढे भाजपा खरं बोलणार असेल तरच युती होईल," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय स्पष्ट केला आहे.

भाजप पक्षाचा सत्तेवर नाही तर सत्यावर विश्वास आहे, सुधीर मुनगंटीवार यांचे उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर 

त्यामुळे  शिवसेना आणि भाजप मधील युतीचं चित्र यापुढे काय असेल हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही. कारण भाजपच्या अनेक नेत्यांनी युती अजूनही असल्याचं मान्य केलं आहे.