Uddhav Thackeray Reaction On Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; काय म्हणाले? जाणून घ्या

मुंबई हे देशातील एक असे शहर आहे जिथे दोन पोलिस आयुक्त असून पाच आयुक्त असले तरी काही अडचण नाही. पण कायदा आणि सुव्यवस्थेचे काय?

Uddhav Thackeray, Baba Siddique (फोटो सौजन्य - फेसबुक)

Uddhav Thackeray Reaction On Baba Siddique Murder: राष्ट्रवादी काँग्रेस नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येवर शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई हे देशातील एक असे शहर आहे जिथे दोन पोलिस आयुक्त असून पाच आयुक्त असले तरी काही अडचण नाही. पण कायदा आणि सुव्यवस्थेचे काय? महाराष्ट्रात खुलेआम हत्या होत आहेत. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. याबाबत पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ही गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे. त्यांनी फक्त मोठमोठे होर्डिंग लावले. राजकारणी म्हणून सत्तेत राहण्याची तुमची लायकी नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत ते म्हणाले, फडणवीस म्हणतात, कुत्राही मेला तर विरोधक राजीनामा मागतील. तुम्ही जनतेला काय समजता? असा सवालही ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी रविवारी सांगितले की, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या एका कथित सदस्याने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेल्या सोशल मीडिया पोस्टची सत्यता तपासत आहे. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे भागातील खेर नगर येथील आमदार पुत्र झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन जणांनी गोळ्या झाडल्या. बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांला मृत घोषित केले. (हेही वाचा - Baba Siddique Murder Case: चौघांनी 3 लाख रुपयांसाठी घेतली होती बाबा सिद्दीकीची सुपारी; कुर्ल्यात भाड्याच्या घरात राहत होते आरोपी)

तथापी, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कथित सदस्याच्या नावाने सोशल मीडियावर एक व्हायरल पोस्ट समोर आली आहे. या पोस्टची सत्यता पोलीस पडताळत आहेत. मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास सुरू केला असून ज्यात सुपारी देऊन हत्या, व्यावसायिक शत्रुत्व किंवा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पावरून मिळालेली धमकी अशा विविध अंगांनी तपास केला जात आहे. (हेही वाचा -Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिघडलेल्या 'कायदा आणि सुव्यवस्थे'वरून विरोधकांचा महाराष्ट्र सरकारवर निशाणा)

दरम्यान, सिद्दीकी यांचा मृतदेह सकाळी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयातून पोस्टमार्टमसाठी विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर, मृतदेह वांद्रे येथील मकबा हाईट्स येथील त्यांच्या घरी नेण्यात आला, जिथे लोक संध्याकाळी सिद्दीकी यांना अंतिम श्रद्धांजली वाहतील. रविवारी रात्री 8.30 वाजता नमाज-ए-ईशानंतर मरीन लाइन्स भागातील बडा कब्रिस्तान येथे बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif