Uddhav Thackeray on Chhagan Bhujbal: 'शिवसेना सोडली नसती तर..', छगन भुजबळ यांच्या वाढदिनी उद्धव ठाकरे यांची तुफान फटकेबाजी
या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विशेष फटकेबाजी केली.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अमृतमहोत्सव (Amrit Mahotsav) कार्यक्रमात राजकीय नेत्यांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विशेष फटकेबाजी केली. उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी अजित पवार यांनी म्हटले की, भुजबळ साहेब जरा चार महिने लवकर आले असते तर मुख्यमंत्री झाले असते. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांनी जर शिवसेना सोडली नसती तर त्याच्याही आगोदर मुख्यमंत्री झाले असते.
भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपण शिवसेना सोडली तेव्हा नक्कीच वाईट वाटले. आपल्या कुटुंबातील व्यक्ती सोडून जाऊच कसा शकतो? हा प्रश्न मनाला होत होता. पण आपण एक चांगले केले की, बाळासाहेब असतानाच तुम्ही सर्व मतभेद मिटवले. मी वैर म्हणणार नाही. वैर हा खूपच टोकाचा शब्द झाला. पण, आता वाटते तुम्ही गेलात. पण जेव्हा सोबत आला तेव्हा आख्खी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घेऊन आलात. केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेसही सोबत घेऊन आलात, अशा शब्दात त्यांनी भुजबळांचे कौतुक केले. (हेही वाचा, Maharashtra Assembly Monsoon Session 2022: 'काळी दाढी, पांढरी दाढी', सत्ताधारी विरोधकांमध्ये टोलेबाजी; छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात नर्मविनोदाची पेरणी)
ट्विट
दरम्यान, जुन्या नव्या सहकाऱ्यांच्या मदतीने लढतो आहे. आयुष्यात नेहमीच वादळे येतात. पण वादळासारख्या लोकांची साथही लाभते आहे. त्यामुळे लढायला बळ मिळते. मी तर लढायचे हे केव्हाच ठरवून टाकले आहे. मी मैदानच शोधतो आहे. परंतू, राजकारणाचा दर्जा इतक्या खाली घसरला आहे की, मैदान मिळविण्यासाठीसुद्धा केर्टीत जावे लागते. पण, काही असले तरी आता आपल्या सोबत मशाल आहे. महत्त्वाचे म्हणजे देशाला 75 वर्षे होत असताना देश पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळविण्याठी लढतो आहे. त्यामुळे त्यासाठी ही मशाल उपयोगी येणार असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी या वेळी लगावला.