Uddhav Thackeray Maharashtra Tour Schedule: उद्धव ठाकरे यांचे पक्ष संघटना बांधणीवर लक्ष्य; विदर्भापासून सुरुवात, जाणून घ्या वेळापत्रक

त्यांनी आता शिवसेना (UBT) पुन्हा नव्याने उभारण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी आवश्यक पक्षबांधणी करण्याचे नियोजन केले आहे. या नियोजनाचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा काढत आहेत.

Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

Uddhav Thackeray Maharashtra Visit: शिवसेना (Shiv Sena) पक्षात झालेल्या अभूतपूर्व फुटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आता पुरेसे सावरले आहेत. त्यांनी आता शिवसेना (UBT) पुन्हा नव्याने उभारण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी आवश्यक पक्षबांधणी करण्याचे नियोजन केले आहे. या नियोजनाचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा काढत आहेत. ज्याची सुरुवात विदर्भातून होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत दौऱ्यामध्ये पक्षाचे फायरब्रँड नेते संजय राऊत, धडाकेबाज वक्त्या सुषमा अंधारे, अभ्यासू आमदार भास्कर जाधव आणि युवा नेते आदित्य ठाकरे असणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची तोफ कशी धडाडते आणि कोणाला लक्ष्य करते त्यासोबत त्याचा पक्ष संघटनेला काय फायदा होतो, याबातब उत्सुकता आहे.

उद्धव ठाकरे हे येत्या 8 आणि 9 जुलै रोजी विदर्भातून राज्यव्यापी दौऱ्याला प्रारंभ करतील. अमरावती येथे ते 8 जुलै तर 9 जुलै रोजी ते यवतमाळचा दौरा करणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्याने पुढच्या दौऱ्याचे नियोजन करतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाची एक बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या वेळी आगामी निवडणुका ताकदीने लढायच्या. या निवडणुका महाविकासआघाडी म्हणूनच एकत्र लढायच्या. महाविकासआघाडी भक्कम करायची. शिवाय समान नागरी कायद्याला पाठिंबा द्यायचा परंतू, त्याबाबतचे धोरण कायद्याचा मसूदा आल्यावरच निश्चित करायचे अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली आणि काही निर्णयही झाले. (हेही वाचा, NCP Crisis: शरद पवार येत्या 8 जुलै रोजी घेणार पहिली सभा; ठिकाणही ठरलं, मातब्बर नेत्याला हादरा; घ्या जाणून)

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचा किल्ला मोजक्या सहकाऱ्यांसोबत लढवत आहेत. दरम्यान, काही मनसे आणि शिवसेना (UBT) मधील कार्यकर्त्यांनाही वाटते की, ठाकरे बंधुंनी म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे. मात्र, मुंबई येथील पक्षाच्या बैठकीत याबाबत कोणताही निर्णय अथवा चर्चा झाली नसल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात हे बंधू एकत्र येणार किंवा नाही याबाबत उत्सुकता आहे.