INDIA's Next Meeting in Mumbai: विरोधकांची पुढची बैठक मुंबईत, उद्धव ठाकरे यांची बंगळुरु येथे घोषणा
आम्ही विजयी होऊ. विरोधकांची एकजूट देशातील हुकुमशाहीला पराभूत करेन. केवळ कोणी एक पक्ष अथवा विचार म्हणजे देश नव्हे. विविध विचारधारेच्या लोकांनी एकत्र येणे हीच खरी लोकशाही आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितले. इतकेच नव्हे तर आम्ही जनतेला सांगू इच्छितो 'डरो मत हम है ना'. आपण घाबरू नका आम्ही आहोत. काहीही झालं तरी आम्ही आपल्यासोबत असू.
Indian National Democratic Inclusive Alliance: राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच नव्या स्वरुपातील भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी (Indian National Democratic Inclusive Alliance) पुढची बैठक मुंबई येथे आयोजित करत आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंगळुरु येथे मंगळवारी (18 जुलै) ही घोषणा केली. बंगळुरु येथे विरोधकांची राष्ट्रीय पातळीवरची एक सर्वोच्च बैठक बंगळुरु येथे पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी देशभरातील 26 राजकीय पक्षाचे प्रमुख नेते व्यासपीठावर आयोजित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, विरोधकांची ही दुसरी बैठक आहे. पहिली बैठक पाटणा येथे पार पडली. दुसरी बंगळुरु येथे. या बैठकी अनेक विषयांवर चर्चा झाली. आमचा विरोध कोणा एका व्यक्तीला नाही. आमचा विरोध हुकुमशाहीला आहे. अनेक लोक म्हणतात तुमची विचारसरणी वेगळी आहे. असे असताना तुम्ही एकत्र कसे येणार? ही केवळ परीवाराची आघाडी आहे. मी त्यांना सांगू इच्छितो, होय ही परिवाराची आघडी आहे. संपूर्ण भारत हाच आमचा परिवार आहे. संपूर्ण देशाच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आगोदरची लढाई स्वातंत्र्यासाठी झाली. आता पुन्हा एकदा ती लढाई लढावी लागणार आहे. (हेही वाचा, New Name Of Opposition Alliance: विरोधी पक्षांची आघाडी INDIA नावाने ओळखली जाणार; बेंगळुरूच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब, जाणून घ्या अर्थ)
व्हिडिओ
आम्हालाला पक्का विश्वास आहे. आम्ही विजयी होऊ. विरोधकांची एकजूट देशातील हुकुमशाहीला पराभूत करेन. केवळ कोणी एक पक्ष अथवा विचार म्हणजे देश नव्हे. विविध विचारधारेच्या लोकांनी एकत्र येणे हीच खरी लोकशाही आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितले. इतकेच नव्हे तर आम्ही जनतेला सांगू इच्छितो 'डरो मत हम है ना'. आपण घाबरू नका आम्ही आहोत. काहीही झालं तरी आम्ही आपल्यासोबत असू. जसा एक चित्रपट आला होता, 'मै हुँ ना' तसेच आम्हीही म्हणतो आहोत हम है ना. देशातील जनता हुकुमशाहीला कंटाळली आहे. ती त्याविरुद्ध उभी राहिली आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे उपस्थितांचे लक्ष लागले होते.