अन 'हे' गाणं ऐकून खासदार उदयनराजे झाले भावूक! सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल (Video)

ऐरवी आक्रमक रूपामध्ये पाहिलेल्या उदयनराजे भोसले यांचा हा हळवा अंदाज पहा, सोशल मीडियामध्ये व्हिडिओ होतोय व्हायरल

Udayanraje Bhosale (Photo Credits: Facebook)

अनेकदा आक्रमक शैली, उद्धट बोलणं अशा कारणामुळे प्रकाशझोकात असणारे खासदार उदयराजे  (Udayanraje Bhosale)यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. उदयनराजे भोसले यांचा भावूक अंदाज पहिल्यांदाच अनेकांसमोर आल्याने अनेक अ‍ॅपच्या माध्यमातून उदयनराजे भोसले यांचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. उदयनराजे यांच्यावरील गाण्याचे बोल ऐकून त्यांना भावना अनावर झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सध्या झपाट्याने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये उदयनराजे त्यांच्या गाडीमध्ये असताना त्यांच्या चाहत्यांचा गराडा होता. यामधील एका व्यक्तीने उदयराजे यांच्यावर रचलेलं एक गाणं त्यांना ऐकवलं. सुरूवातीला उदयनराजे यांना हा प्रकार मजेशीर वाटला त्यांनी कपाळावर हात मारला पण पूर्ण गाणं ऐकल्यावर त्यांना भावना अनावर झाल्या.आसवांच्या माध्यामातून त्यांनी त्या मोकळ्या केल्या.

'माझ्यामुळे समाज आहे, समाजामुळे मी आहे' या गाण्याचं शब्द ऐकून उदयनराजे यांच्या डोळ्यातून पाणी आलं. शर्टनेच त्यांनी ही आसवं पुसली.