मुंबईकरांसाठी लवकरच उबर घेऊन येणार UberBOAT सेवा, स्पीडबोटने अवघ्या काही मिनिटात गाठू शकणार मांडवा, अलिबाग, एलिफंटा
अद्याप उबर कडून याबाबात कोणतीच थेट घोषणा करण्यात आलेली नाही.
UberBOAT: कार आणि ऑटो रिक्षानंतर आता मुंबईकरांना लवकरच Uber द्वारा मोबाईलवर अवघ्या एका क्लिकवर 'स्पीड बोट' (Speed Boat) या वाहतुकीच्या नव्या पर्यायाचा आनंद घेता येणार आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरून ही 'उबर बोट' (UberBOAT) सेवा सुरू होण्याची शक्यता असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडीयाने दिलं आहे. अद्याप उबर कडून याबाबात कोणतीच थेट घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच मुंबईकरांना एक नवा वाहतुकीचा पर्याय मिळणार असल्याचं उबरकडून सांगण्यात आलं आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सुरूवातीला गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा (Gateway-Mandwa Jetty )असा प्रवास करण्याची सोय देण्यात येईल. पुढे भविष्यात ही सोय अलिबागपर्यंत आणि नवी मुंबई ते दक्षिण मुंबई अशीदेखील केली जाईल असे सांगण्यात आले आहे. कारचालकाचा अपमान करणाऱ्या ग्राहकाला उबर करणार ब्लॉक; APP मध्ये केले 'हे' महत्त्वाचे बदल
कशी असेल सोय आणि प्रवास?
सहा जणांसाठी बुकिंगची सोय उबर अॅपच्या माध्यमातून उबर बोटसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. गरजेनुसार तुम्हांला संपूर्ण स्पीडबोटदेखील बुक करता येणार आहे. प्रवासाच्या किमान 15 मिनिटं आधी ही बोट बुक करण्याची सोय देण्यात आली आहे. सध्या तासभर लागणार्या या प्रवासासाठी भविष्यात 20-22 मिनिटं लागण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांना साधा शहरातल्या शहरात प्रवास करायचा म्हटला तरीही किमान तासाभराचा वेळ जातो. त्यामुळे सुट्ट्यांच्या काळात बाहेत पडले तरीही ट्राफिक जॅमचा त्रास असतोच. पण भविष्यात उबरने स्पीड बोट सेवा खुली केल्यास अनेकांचा नियमित प्रवासाचा बराच वेळ आणि कष्ट कमी होणार आहेत.