नालासोपारा: धानीव परिसरातील वाकणपाडा येथील तलावात बुडून दोघांचा मृत्यू
ही घटना नालासोपारा (Nala Sopara) येथील वाकणपाडा (Wakanpada) परिसरात रविवारी सायंकाळी घडली आहे.
मुंबईवर (Mumbai) कोरोनाचे संकट वावरत असताना दोन तरुणांचा तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. ही घटना नालासोपारा (Nala Sopara) येथील वाकणपाडा (Wakanpada) परिसरात रविवारी सायंकाळी घडली आहे. यामुळे संपूर्ण वाकणपाडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी एका मुलाचा तोल गेल्याने तो तलावात पडला होता. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली होती. मात्र, दुर्देवाने दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. त्यांचे मृतदेह तलावातून शोधून बाहेर काढण्यात वसई विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकास यश आले आहे.
साहिल खान (वय 14) आणि शोएब शेख (वय 19) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. साहिल खान हा रविवारी सायंकाळी घरा मागील तलावाकाठी बसला होता. त्यावेळी अचानक त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला होता. साहिलला पोहता येत नसल्याने त्याला वाचविण्यासाठी शोएब याने तलावात उडी घेतली. मात्र, दुर्देवाने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- मुंबई: चेंबूर येथे कोविड19 ऑफिसर सांगत एका तरुणाकडून लुटले तब्बल 54 हजार रुपये; एकास अटक
एएनआयचे ट्विट-
वसई विरार शहर आणि ग्रामीण भागात आज तिसऱ्या दिवशीही पाऊसाने जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली आहे. वादळामुळे शनिवारी 18, तर आज तालुक्यात लहान मोठी 23 वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. वसईतील सागरशेत येथे दुपारी कोसळलेल्या मोठ्या वृक्षामुळे काही तास रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.