मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी भागात घर कोसळल्याने दोन महिला जखमी

या महिलांना स्थानिकांनी कुपर रुग्णालयात (Cooper hospital) दाखल केले आहे. यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.

House collapsed Representative Image | (Photo Credits: Twitter)

मुंबईतील (Mumbai) जोगेश्वरी पूर्व (Jogeshwari East) येथील मेघवाडी भागात (Meghwadi Area) घर कोसळल्याने दोन महिला किरकोळ जखमी (Injured) झाल्या आहेत. या महिलांना स्थानिकांनी कुपर रुग्णालयात (Cooper hospital) दाखल केले आहे. यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.

दरम्यान, आज दुपारी कुर्ल्यात एका मोडकळीस आलेल्या इमारतीचा भाग कोसळला. परंतु, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही इमारत कुर्ला स्टेशन रोडवर पालिका एल विभाग कार्यालयाला लागून आहे. या इमारतीला पालिकेने अतिधोकादायक म्हणून घोषित केलेले आहे. परंतु, तरीदेखील या इमारतीमध्ये अजूनही काही कुटुंब राहतात आहेत. आज मुंबईत दुपारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पालिकेचे आपत्कालीन व्यवस्था अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. (हेही वाचा - मुंबई: कुर्ला स्टेशन रोड भागातील तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला; मात्र कोणतीही जीवितहानी नाही)

आज मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक सह कोकणामध्येही दमदार पावसाने हजेरी लावली. मुंबईच्या अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. हवामान विभागाकडून पुढील काही तास मुंबई शहारामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.